AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : घर 1 पण भाडेकरू 17 ? पवईत ‘ड्रीम होम’च्या नावाने कोट्यवधींचा गंडा

मुंबईतील पवई परिसरातील तुंगा गावात घरभाड्याच्या नावाखाली मोठी फसवणूक उघड झाली आहे. एका घरमालकाने एकच घर १७ जणांना भाड्याने देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वा कोटी रुपये उकळले. बँकेने जप्त केलेली मालमत्ता असल्याचे नंतर उघड झाले. पीडितांनी पवई पोलिसांत तक्रार केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Crime : घर 1 पण भाडेकरू 17 ? पवईत ‘ड्रीम होम’च्या नावाने कोट्यवधींचा गंडा
| Updated on: Aug 03, 2026 | 12:37 PM
Share

मुंबईतील पवई परिसरातील तुंगा गावात घरभाड्याच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका घरमालकाने एकच घर तब्बल 17 जणांना भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फसवणुकीमुळे मोठी खळबळ माजली असून फसवणूक झालेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित या घरमालकाविरोधात पवई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घरमालकाने “हेवी डिपॉझिट”च्या नावाखाली प्रत्येक भाडेकरूकडून सुमारे ६ लाख रुपये घेतले. घर भाड्याने देण्याचा करार करूनही प्रत्यक्षात घराचा ताबा न देता, भाडेकरूंना दर महिन्याला ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली जात होती. त्यामुळे अनेकांना सुरुवातीला हा प्रकार लक्षात आला नाही.

या पद्धतीने १७ जणांकडून पैसे घेत आरोपीने अंदाजे सव्वा कोटी रुपयांची रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. मात्र, एका दाम्पत्याला संशय आल्यानंतर त्यांनी तुंगा गावातील संबंधित घराला भेट दिली. त्यावेळी घरावर बँकेची जप्तीची कारवाई झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अशी उघड झाली फसवणूक

मात्र त्या घरमालकाने बँकेचे कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे संबंधित मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी पीडित भाडेकरूंनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित घरमालकाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, तसेच जमा केलेली रक्कम कुठे वापरण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र फसवणुकीच्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून नागरिकांनी सावध आणि सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी