Pradeep Purnekar Case : गरीबांसाठी कैवारी होता हो, लोक त्याला मानपाड्याचा वाघ म्हणायचे, सगळं संपलं, रस्त्यावर आलो, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचे मन सून्न करणारा टाहो
Pradeep Purnekar Case : "गणपतीत आमच्याकडे भरपूर येऊ लागलेला. आम्हाला डाऊट आला नाही, कारण शेवटी मित्रच होता. यांना सांगितलेलं विश्वास ठेऊ नका. पण यांनी नाही ऐकलं माझं" असं पूर्णेकरांच्या पत्नी म्हणाल्या.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन प्रदीप पूर्णेकर यांना संपवण्यात आलं. त्यांच्या पत्नीचा आक्रोश थांबत नाहीय. आज प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “कशासाठी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला? किती चांगला माणूस होता, कशासाठी जीव घेतला? एका ताटात खाणारा माणूस. आमच्या घरात येऊन राहाणारा माणूस. त्याने कसं फसवलं बघा. कोणावर भरवसा ठेवायचा, कोणावर नाय. बघा सख्ख्या मित्राने कसं फसवलं. पप्या शिंदे त्याचं नाव. आमच्यासमोर त्याला फाशी दिली पाहिजे. बाकीचे तीन आरोपी त्यांना सुद्धा शोधून फाशी द्या” अशी मागणी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने केली. पप्या शिंदेंची आई म्हणाली की, पूर्णेकर आणि ते चांगले मित्र होते. “आधी चांगले मित्र होते, पण पप्या शिंदेचा लहान भाऊ जेलमध्ये होता, तेव्हा त्याला सोडवायला मिनाक्षी शिंदे यांनी मदत केलेली. तेव्हा त्याने त्याचा मोर्चा तिच्याकडे वळवला. तेव्हापासून तो तिचच ऐकत होता” असं प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीने सांगितलं.
“यात राजकारण नक्कीच आहे. मिनाक्षी शिंदेने मित्राला घेऊन राजकारण केलं. मित्रच मारेकरी घेऊन आला. आम्हाला रस्त्यावर आणलं. सगळं आमचं घर त्यांच्यावर डिपेंड होतं. साहेबांना एकच सांगेन या सगळ्यांना फाशी द्या. मानपाड्यासारख्या छोट्या गावात वार,फायरिंग ही छोटी गोष्ट आहे का?. माझा नवरा क्रिमिनल होता का? माझा नवरा खूप मोठा राजकारणी होता का? एक साधारण छोटा माणूस होता” असं प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी म्हणाल्या.
माझ्या डोळ्यासमोर पप्या शिंदेच येतो
“माझ्य नवऱ्याची सुपारी दिली. यामागे दोघेच आहेत मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे. आधी आमचे मिनाक्षी शिंदेंसोबत घरचे संबंध होते. कालांतराने पैसा भेटायला लागला, तसं त्या बाईच्या अंगात भूत शिरलं. आम्हाला लांब केलं. आमच्याशी कुठलाही संबंध ठेवला नाही. माझं तर लेन-देणच नाही. काय बोलणार आमचा माणूस गेला. टल्ली या आरोपीला मी ओळखत नाही. माझ्या डोळ्यासमोर पप्या शिंदेच येतो. मिनाक्षी शिंदेंनी सुपारी दिली” असं आरोप पूर्णेकर यांच्या पत्नीने केला.
नुसता जबाब नको, फाशी द्या
“माझा नवरा खूप सामान्य माणूस होता. असा न्याय द्या इथून पुढे असे मर्डर नाही झाली पाहिजे. दहागोळ्या झाडल्या, वार केले अहो हे काय लावलय. गरीबांसाठी कैवारी होता हो माझा नवरा. लोक त्याला मानपाड्याचा वाघ म्हणायचे. सगळं संपलं, रस्त्यावर आलो आम्ही. नुसता जबाब नका घेऊ. फाशी द्या. त्या बाईने सगळ्यांना खरेदी केलेलं आहे. आम्हाला न्याय पाहिजे” अशी मागणी पूर्णेकर यांच्या पत्नीने केली.