प्रवीण दरेकरांनी पराभवाचं खापर शिंदे गटावर फोडलं; म्हणाले, वरून आदेश आल्याशिवाय…नेमकं काय बोलून गेले

विधानपरिषदेच्या निकालावर प्रवीण दरेकरांनी मोठं भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटावर पराभवाचं खापर फोडलं. यावेळी शिंदे गटाला महत्वाच्या सूचना देखील केल्या.

प्रवीण दरेकरांनी पराभवाचं खापर शिंदे गटावर फोडलं; म्हणाले, वरून आदेश आल्याशिवाय...नेमकं काय बोलून गेले
pravin darekar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 2:58 PM

राज्यातील 5 जागांवरील निवडणुकीत महायुतीला 3 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे.  या निकालानंतर महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीत शिंदे गटाने युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या नवनाथ बन यांच्यानंतर प्रवीण दरेकरांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. रविंद्र धंगेकरांच्या निवडणुकीतील भूमिकेवर आक्षेप घेताना वरून आदेश आल्याशिवाय होत नाही, असा गंभीर आरोप आमदार प्रवीण दरेकरांनी आरोप केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, ‘तुमचं स्वत:चं वाटोळं झालं. तुम्हाला लोकांनी शून्य केलं. याचं भान नाही. दुसऱ्यांना थोडं अपयश आलं. त्यात आनंद मानायचा. अशा प्रकारची विकृत आनंद घेणारी काँग्रेस आणि उबाठा आहे. काँग्रेसला एक जागा मिळाली. त्यातही दुसर्‍या पसंतीची क्रमाकांची मते मिळाली. कारण ते भाजपचे मतदार नसतात. त्यात भाजपच्या विरोधात लोक होती. बाकी काँग्रेसची परंपरांगत जागा होती, ती भाजपने जिंकली. दुसऱ्या जागेच कारण सर्वश्रृत आहे. पुण्याची जागा पडली. तिकडे पूर्णपणे मित्रपक्षाने त्यांचे मतदार हे दुसऱ्या पक्षाकडे वळवले. तोच फरक तिकडे दिसला. तिकडे स्मिता जाधव निवडून आल्या असत्या. त्यामुळे सर्व निकाल बघा’.

Loading...

‘अमरावती विभागात भाजपचे पदाधिकारी उभे होते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं. तुम्ही श्रीकांत देशपांडे आणि इतर भाजपचे बंडखोरांच्या मतांची गोळाबेरीज केल्यावर पाहता येईल की, तिथेही शिंदे गटाचे किरण सरनाईक यांना पराभवाला सामोरे जावं लागलं असतं. परंतु आम्ही महायुतीचा धर्म बजावला. महायुतीच्या घटकपक्षाने युतीधर्म पाळला नाही. मैत्रीपूर्ण लढत केली, इथपर्यंत ठीक होतं. महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे पाप हे मित्रपक्षाने केल्याचे स्पष्ट झालं आहे.

‘पुण्याचा महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी निवडणुकीआधी आवाहन केलं होतं. तर निवडून आल्यानंतरही प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या शहराचा महानगरप्रमुख भूमिका घेतो. त्यावेळी तो पक्षाचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. वरून आदेश आल्याशिवाय होत नाही. मला वाटतं यात आता शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेनं देवाभाऊ, अजितदादा, एकनाथ शिंदे असताना सरकार बनवलं. आपल्यातच कुरघोडी, तू मोठी की..मी मोठा यावरून वार पलटवार होत असेल, तर महायुतीच्या भविष्यासाठी चांगलं राहणार नाही. आमचा पक्ष आत्मचिंतन करतो. चुका दुरुस्त करतो. परंतु शिंदे गटानेही भूमिका मांडताना महायुतीत वितुष्ट येईल, अशी मांडू नये, असे दरेकर पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us