
काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं. तेथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या गायकवाड यांना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांना काळ फासलं एवढंच नव्हे तर त्यांना मारहाणही करण्यात आली. आपली हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. या प्रकारामुळे राज्यभरात प्रचंड खळबळ माजली होती, आता याच घटनेच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले. पोलिसांनी हल्ल्याची योग्य दखल घेतली नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान या हल्ल्यातील आरोपी दीपक काटे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. तो सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दिसला आहे, काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्याला भाजपमध्ये पद देण्यात आल्याचं सांगत गायकवाड यांनी अनेक आरोप केलेत.
काय म्हणाले गायकवाड ?
अक्कलकोटला जे झालं त्याबद्दल मी विस्ताराने बोललो आहे, पण तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात सांगतो. आदरणीय जन्मेजय राजे भोसले हे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात, त्यांचं समाजकार्य मोठं आहे. त्यांचं वय, पद लक्षात घेता, त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार व्हावा, त्यांचा सत्कार करण्यात येणार होता.तिथे अचानक माझ्यावर जे वंगण तेल टाकलं , ते आता परीक्षणासाठी गेलं आहे.त्यानंतर सुरक्षिततेसाठी मला गाडत नेण्यात आलं पण तिथेही जीपक काटे या गुन्हेगाराने माझ्यावर हल्ला केला. आमच्या कार्यकर्त्यांनी कसंतरी सावरलं. मात्र हल्ल्यानंतर आयोजकांनी कोणतीही तक्रार केली नाही.
गंभीर गुन्हे असलेला माणूस भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीसपदी कसा ?
ही घटना घडत असताना भाजपच्या पीआर एजन्सीने संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली याचा अर्थ काय घ्यायचा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्यावर भावाच्या हत्येच्या आरोपापासून खंडणीपासून अनेक गंभीर आहेत, तरीही त्यांना भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीसपद दिलं आहे. मुख्यत: चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे हे सातत्याने त्यांच्यासोबत दिसले, असा आरोप गायकवाड यांनी केला. त्यांच्याकडे 2 पिस्तुलं आणि 28 काडतुसं सापडल्यावर त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र, त्यानुसार आर्म ॲक्टखाली त्यांना जामीन मिळणार नाही असं स्पष्ट होतं. मात्र कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही सांगत न्यायलयाने जामीनाचा आदेश दिला.
ज्याने भावाच्या हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात शिक्षा भोगली, त्याला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असं त्याच्याबद्दल न्यायालयात सांगण्यात आलं, असं सांगत गायकवाड यांनी काटे, बावनकुळे व भाजपावर टीका केली.