राष्ट्रपतींची वर्ध्यात सेवाग्रामला सहकुटुंब भेट, पत्नीसह सूतकताई

राष्ट्रपतींची वर्ध्यात सेवाग्रामला सहकुटुंब भेट, पत्नीसह सूतकताई

वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. सकाळी अकरा वाजता राष्ट्रपतींचं सेवाग्राम आश्रमाला आगमन झालं. यावेळी राष्ट्रपतींनी (President Ramnath Kovind) सहकुटुंब भेट दिली. सेवाग्रामला (Wardha Sevagram) सहकुटुंब भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरले. त्यांनी यावेळी पत्नीसह अंबर चरखा चालवत सूतकताई केली. यात आश्रमात (Wardha Sevagram) एवढे रमले की निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधी त्यांनी तेथे घालवला. निर्धारित कार्यक्रमानुसार 25 मिनिटाची भेट असताना 45 मिनिटे कार्यक्रम चालला.

सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू आदींची उपस्थिती होती.

आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपतीचं स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीने अंबर चरख्यावर सूतकताई केली. त्यांच्या मुलीनेही चरखा चालवून बघितला. राष्ट्रपतींनी आश्रम परिसराची पाहणी करत माहिती जाणून घेतली. राष्ट्रपतींनी खादी निर्मिती केंद्राची पाहणी केली. यावेळी बापूकुटीत प्रार्थनादेखील केली. महादेव भाई कुटीसमोर राष्ट्रपतींच्या हस्ते चंदनाचं वृक्षारोपण करण्यात आलं.

राष्ट्रपतींनी आश्रमाला 150 वर्षे सेलिब्रिटी द महात्मा या पुस्तकाच्या हिंदी, इंग्रजी अशा दोन प्रति भेट दिल्यात. राष्ट्रपती नियोजित कार्यक्रमाच्या 15 मिनिट जास्त आश्रमात थांबले. आश्रमाच्या वतीने राष्ट्रपतींना चरख्यातून होणाऱ्या उद्योग निर्मितीची माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली आणि अभिप्राय पुस्तिकेत अभिप्रायही नोंदविला. यावेळी त्यानी कपडे कसे बनवतात हे माहित नसल्याने ‘कपास से कपडाची’ संपूर्ण पद्धत जाणून घेतली.

खादीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यावर काही तरी करायला पाहिजे, असं सेवाग्राम प्रतिषष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी महामहिम राष्ट्रपतींना सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *