AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजपची ‘लेट नाईट’ बैठक, काय घडतंय? प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

काल रात्री उशीरा पुण्यात भाजपची बैठक पार पडली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप चे मोठे नेते पुण्यात आहेत. या "लेट नाईट" बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते.

पुण्यात भाजपची 'लेट नाईट' बैठक, काय घडतंय? प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
| Updated on: May 11, 2024 | 9:02 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्प्यातील मतदान देशभरात पडले आहे. मात्र अजूनही मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातही तीन टप्प्यांत मतदान झाले आहे मात्र अद्यापही पुणे, नाशिक, मुंबईसह अनेक महत्वाच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून काल रात्री उशीरा पुण्यात भाजपची बैठक पार पडली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मोठे नेते पुण्यात आहेत. या “लेट नाईट” बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी पुण्यात मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची ही महत्वाची बैठक झाली. या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील झालेल्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत महत्वाची चर्चाही करण्यात आली. आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे समन्वयक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

दरम्यान मावळ लोकसभेसाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मावळ लोकसभेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो होणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची बाईक रॅली असणार आहे. मावळ लोकसभेत एकूण 33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यात प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार असल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. महायुती कडून श्रीरंग बारणे,महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे आणि वंचित बहुजन आघाडी कडून माधवी जोशी अशी तिरंगी लढत पाहयला मिळणार आहे. मतदार त्यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात मत टाकून विजयी करतात, हे 4 जून रोजीच समजणार आहे.

शिरूर मध्येही आज प्रचार थंडावणार

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 मे रोजी होणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. शिरूर लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडूनही दिग्गज नेत्यांच्या सभा आज मतदार संघात पार पडणार आहेत. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी यांची सभा होणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री भास्करराव जाधव, चंद्रकांत हंडोरे, आमदार सचिन अहिर व प्रवीण गायकवाड यांच्या तोफा आज शिरूर लोकसभा मतदारसंघात धडाडणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार असून कोण कोणावर निशाणा साधते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मतदानासाठी प्रत्येक कामगाराला मिळणार भरपगारी सुट्टी

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक कामगाराला मतदानासाठी भरपगारी सु्ट्टी मिळणार आहे. मात्र मतदानाची ही सुट्टी इतर दिवशी भरून काढली तर ते कंपन्यांना महागात पडणार आहे. उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या 13 मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश पुणे विभागाचे कामगार उपायुक्त अभय गीते यांनी दिले आहेत. काही व्यवस्थापनाकडून कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी न देता एक दिवसाचे जादा काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या असल्याबाबत कामगार विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची भरपाई करून घेऊ नये असे सांगण्यात आले आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....