तुम्ही नालायक गृहमंत्री… राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले

Amit Shah : दिल्लीतील आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तुम्ही नालायक गृहमंत्री... राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले
Pruthviraj Chavhan asks Amit Shah resign
Image Credit source: Google
| Updated on: Aug 14, 2026 | 4:48 PM

काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नीट पेपफुटीप्रकरणी आवाज उठवण्यात आला होता, तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे आंदोलन संपले होते. मात्र या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यात अनेक आंदोलक जखमी झाले होते.

अमित शहांनी लाठीचार्जचे आदेश दिले, विरोधकांचा आरोप

दिल्लीनंतर बिहारमध्येही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आंदोलकांना धमकावण्यासाठी एके 47 गन दाखवली होती. याचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. दिल्लीत लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोनावेळी एके 47 चा वापर हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट अमित शहांचा राजीनामा मागितला आहे. चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या…

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, सभागृहासमोर यायला तुम्ही घाबरत आहात, तुम्ही येत नाही, कोण पळपुटं आहे मग? आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही उत्तरं द्या. पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे. उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काही म्हणणार नाही, पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला की नाही, पॅलेट गन वापरल्या की नाही? एका मुलाचा डोळा गेला की नाही? बिहारमध्ये एके47 वापरल्या. कुणी तरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना मी नाही दिला. मला माहिती नाही कुणी केलं. मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तरं द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही हा घटनेचा अपमान आहे. लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us