काळ आला होता पण… मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मध्यरात्री आग, खासगी बस जळून खाक

| Updated on: Apr 21, 2024 | 10:58 AM

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक खासगी प्रवासी बसला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आणि ती बस जळून खाक झाली. मात्र चालकाची सतर्कता आणि सावधानतेमुळे प्रवाशांना पटापट खाली उतरवण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झाले नाही.

काळ आला होता पण... मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मध्यरात्री आग, खासगी बस जळून खाक
Follow us on

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक खासगी प्रवासी बसला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आणि ती बस जळून खाक झाली. मात्र चालकाची सतर्कता आणि सावधानतेमुळे प्रवाशांना पटापट खाली उतरवण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली अथवा कोणीही जखमी झाले नाही. बसमधील 42 प्रवासी सुखरूप आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच भावना बसमधील प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर खोपोली हद्दीजवळ ही दुर्घटना घडली. ही प्रवासी बस मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जात असताना बसमधून अचानक धूर येऊ लगाला. त्यावेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते, जे सर्व गाढ झोपेत होते. बसमधून धूर येत असल्याचे बसचालकाच्या लक्षात आले आणि त्याने प्रसंगावधान राखत बस तत्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर त्याने बसमधील सर्व प्रवाशांना जागे करून सुरक्षित रित्या, सुखरूपपणे खाली उतरवलं.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच खोपोली अग्निशामक दल देवदूत रेस्क्यू टीम, आयआरबी डेल्टा फोर्स, दस्तुरी बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशम दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत ती बस संपूर्णपणे जळून खाक झाली. मात्र या घटनेमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही लेनवरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती.