मोठी बातमी: खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी

कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा. | Private bus

मोठी बातमी: खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 10:29 AM

मुंबई: राज्य परिवहन महामंडळानंतर आता दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. (Private buses in state can be operational at 100 percent)

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 20 (1) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे, तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी एखाद्या प्रवाशास ताप , सर्दी, खोकला, अशा प्रकारचे कोविड 19 चे प्राथमिक लक्षण दिसत असल्यास अशा प्रवाशांना बस मधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.

हे नियम पाळावे लागतील – खासगी कंत्राटी बस वाहनांमधून 100 टक्के क्षमतेने पर्यटक प्रवासी वाहतुकीस परवानगी – चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोहार, प्रसाधनगृहासाच्या वापर याकरिता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ ठेवणे – बसमध्ये चढतांना,उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबलेली असतांना प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवणे, – प्रवासी बस चे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल – मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही – तिकीट /चौकशी खिडकी स्वच्छ असली पाहिजे – प्रवासाच्या आधी प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासावे. ताप,खोकला,सर्दी असल्यास प्रवासास परवानगी नाही

नियमांचे पालन न केल्यास कारवाई

उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास परवानगी धारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

संबंधित बातम्या:

Corona Effect : कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट

मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचा फटका, खासगी बस भाड्यात वाढ

(Private buses in state can be operational at 100 percent)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.