पहाटे नको तेच घडले, सकाळी सकाळी पतीने… महिलेची प्रकृती चिंताजनक, पुण्यात धक्कादायक घटना..

एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली. थेट महिलेला रूग्णालयात दाखल करावे लागले. यासोबच मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पतीला एक प्रश्न विचारणे महिलेच्या अंगलट आले..

पहाटे नको तेच घडले, सकाळी सकाळी पतीने... महिलेची प्रकृती चिंताजनक, पुण्यात धक्कादायक घटना..
PCMC news
| Updated on: Feb 20, 2026 | 1:54 PM

नुकताच एक धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. आपण नेहमीच ऐकले असेल की, दारुमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्थ झाले. आता अशाच प्रकारची घटना पुढे आली. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पतीने थेट दारु पिण्यास सुरूवात केली. ही गोष्टी पत्नीला आवडली नसल्याने तिने पतीला म्हटले, तुम्ही सकाळी सकाळी दारु पिण्यास का सुरूवात केली? पत्नीचे हे वाक्य कानावर पडताच पतीचा पारा चढला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. ही मारहाण अशी तशी नसून पतीने इतके मारले की, पत्नी मृत्युसोबत झुंज देत आहे. सध्या पीडित महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू असून तिची स्थिती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली. पती गेल्या काही दिवसांपासून नशेच्या आहारी गेला, ज्यामुळे पत्नीने त्याला फक्त सकाळी दारु पिण्यापासून रोखले आणि ही धक्कादायक घटना घडली.

हैराण करणारे म्हणजे पत्नीने विचारलेल्या प्रश्नानंतर या पतीने हाताने मारहाण न करता थेट चाकूनेच पत्नीवर हल्ला चढवला. ही थरकाप उडवणारी घटना पिंपरी चिंचवडच्या जाधववाडी परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ बीडचा दीपक भोगले हा जाधववाडीच्या पंतनगर भागात आपल्या कुटुंबासोबत राहत. मात्र, त्याला दारुचे व्यसन लागले.

त्याने शु्क्रवारीही नेहमीप्रमाणे दारुनेच दिवसाची सुरूवात केली. हे पाहून पत्नीने विचारले की, तुम्ही सकाळी सकाळी दारु का पित आहात? मग दीपकला इतका जास्त राग आला की, त्याने थेट दारुच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केला आणि चाकूने हल्ला केला. चाकूच्या हल्ल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली.

घडलेला प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात घेता, त्यांनी महिलेला रूग्णालयात दाखल केले. मात्र, महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात असल्याची माहिती मिळत आहे. पतीनेच पत्नीवर चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली.