AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार विमान अपघातात थेट धक्कादायक माहिती पुढे, 28 जानेवारीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही थेट…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. मात्र, अनेक संशय अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर व्यक्त केली जात आहेत.

अजित पवार विमान अपघातात थेट धक्कादायक माहिती पुढे, 28 जानेवारीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही थेट...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 20, 2026 | 12:37 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काही प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याकरिताच अजित पवार बारामतीच्या दिशने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या विमान अपघातात जखमी झाले आहेत. मात्र, त्यानंतर हैराण करणारी बातमी पुढे आली आणि स्पष्ट झाले की, अजित पवार यांच्यासह विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडली आहेत. त्यामध्येच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत असून अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशय अधिकच वाढल्याचे बघायला मिळतंय. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी 28 जानेवारी 2026 रोजीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र, सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने हे देण्यास नकार दिला.

सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याने संशय अधिक वाढला. हेच नाही तर नितीन यादव यांनी थेट न्यायालयात याविरोधात धाव घेतली. नितीन यादव यांनी 28 जानेवारीचे सकाळी 6 ते 9 दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मुंबई विमानतळावरील हालचाली त्यांना बघायच्या होत्या. कारण ज्यावेळी अजित पवार मुंबई विमानतळावर पोहोचले, त्यावेळी नक्की काय घडले हे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बारीकपणे तपासायचे होते.

अजित पवार घरातून किती वाजता निघाले आणि नक्की काय घडले हे तपासायचे होते. कारण अजित पवार विमानतळावर पोहोचल्यानंतरचा त्यांचा तो शेवटचा व्हिडीओ असेल. हे सीसीटीव्ही व्हिडीओ मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. आता कोर्ट या प्रकरणात नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...