महात्मा गांधींना नथुरामनेच मारलं, पण काँग्रेसने त्यांना वाचवलं नाही हेही तितकंच खरं- आनंद दवे

| Updated on: Dec 18, 2022 | 5:23 PM

आनंद दवे यांनी गांधी हत्येवर भाष्य केलंय...

महात्मा गांधींना नथुरामनेच मारलं, पण काँग्रेसने त्यांना वाचवलं नाही हेही तितकंच खरं- आनंद दवे
Follow us on

पुणे : हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी गांधी हत्येवर (Mahatma Gandhi) भाष्य केलंय. आम्ही होय फक्त आम्हीच सुरवातीपासून म्हणत आहोत की, महात्मा गांधींना नथुरामनेच मारलं, पण काँग्रेसने त्यांना वाचवलं नाही हेही तितकंच खरं. डॉ. रावसाहेब कसबे आज हेच बोललेत, असं आनंद दवे (Anand Dave) यांनी म्हटलंय.

गांधीजी यांची हत्या 30 जानेवारीला झाली. त्याआधी त्याच जागी 20 जानेवारी रोजी मदनलाल पाहावाने हत्येच्याच उद्देशाने बॉम्ब फोडला. पकडला गेला आणि त्याला जामीन पण झाला. त्या चौकशीत गोडसे, आपटे, बडगे यांची नावे आली होती. मोरारजी देसाई, खैर यांना हे कळवले होत याचे पुरावे आहेत.कपूर आयोगा पुढे जैन यांनी मोरार्जी यांच्यावर तसे आरोप पण केले होते. पण त्यांना वाचवण्यासाठी काहीच हालचाल झाली नाही, असंही दवे म्हणालेत.

त्यात गोडसे यांचं नाव पण आले पण पोलिसांनी त्यांना 10 दिवसात पकडलं नाही. उलट 30 जानेवारीला ते गांधीजी यांच्यापर्यंत पोहोचू शकले हे वास्तव आहे. काँग्रेस बरखास्त करा अशी मागणी गांधीजी करत होते. त्यासाठी ते 12 जानेवारीपासून उपोषणला बसणार होते याकडे का आपलं लक्ष जात नाही. माझ्या पक्षातील अनेकांना मी नको आहे हे त्यांचं वाक्य आपण का विसरलो आहोत, असंही दवे म्हणाले आहेत.

30 जानेवारी लाच दुपारी 3 वाजता गोडसे गांधीजी झोपले होते. तेव्हा त्यांच्या शेजारी जाऊन आला, असं मनुबेन यांनी नंतर सांगितलं. कोणालाच आश्चर्य वाटत नाही. गोडसे यांचा तो पाचवा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एकच माणूस एकाच माणसाची हत्या करायला एकाच ठिकाणी पाच वेळा सहज पोहोचतो, पाचव्या वेळेस 3 फुटावर येतो, पाया पडतो. जवळच्यांना ढकलतो आणि गोळया घालतो आणि शेजरी एकही पोलीस, कार्यकर्ता वाचवायला नसतो याच आपल्याला आश्चर्य का वाटत नाही, असंही दवे म्हणालेत.

29 जानेवारी ला रावसाहेब गुट्टू यांनी गोडसे, आपटे यांचे फोटो दिल्ली पोलिसांना दिले होते पण ते घटना स्थळी अधिकाऱ्यांना देण्याचं विसरले गेले अशी अधिकृत नोंद आहे. 30 जानेवारी ला सायंकाळी 6 च्या सुमारास गांधीजी मारले जातात पण दुपारी 3 वाजताच त्यांची हत्या झाल्याची पत्रके राजस्थानमध्ये वाटली जातात. त्याची बातमी दिल्लीत येते पण काहीच काळजी घेतली जात नाही, असंही ते म्हणालेत.

सर्वात महत्वाचे 15 ऑगस्ट 1946 ला डायरेक्ट अॅक्शन म्हणून सुरु झालेली हिंदूंची कत्तल तब्बल दीड वर्षांनी गांधी हत्ये नंतर लगेचच थांबली… एकदम थांबली… सगळंच अनाकलनीय… गांधीजी हत्येसारखं, असंही दवे म्हणालेत.