जम्मू-काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या निर्णयाला पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा विरोध

| Updated on: Aug 28, 2022 | 12:20 AM

पुण्यातील मानाच्या पाच आणि इतर तीन अशा अष्टविनायक मंडळांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत 2023 मध्ये जम्मू कश्मीर मधील आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले. मात्र आता या घोषणेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विरोध दर्शवला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या निर्णयाला पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा विरोध
Follow us on

पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील गणेश मंडळांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला दगडूशेठ गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या(Dagdusheth Halwai Ganapati Trust) या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यावरून पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद असल्याचे यावरुन दिसत आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार की नाही असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा विरोध

पुण्यातील मानाच्या पाच आणि इतर तीन अशा अष्टविनायक मंडळांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत 2023 मध्ये जम्मू कश्मीर मधील आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले. मात्र आता या घोषणेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विरोध दर्शवला आहे.

आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा केल्याचा आरोप

गणेशोत्सवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे असं सांगत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विरोध दर्शवला आहे.त्याचबरोबर आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा केला असल्याचा आरोप देखील दगडूशेठ गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रप्रेम वाढावे यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रप्रेम वाढावे यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav)सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सव राष्ट्रीय स्वरुपात साजरा करण्यात येऊ लागला. त्यानुसार पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेले आहे. पुढच्या वर्षी पुण्यातील 8 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जम्मू-काश्मिरात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

दीड दिवसांचा गणेशोत्सव

या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातून गणरायांची मूर्ती जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात येणार आहे. दीड दिवसाचा गणेशोत्सव जम्मू-काश्मीरमध्ये साजरा करण्याची योजना आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी काश्मिरी लोकांना बळ मिळावं म्हणुन हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काश्मिरात कुठे होणार गणेशोत्सव साजरा?

पुण्यातील आठ गणेश मंडळ जम्मू काश्मीरमधील आठ ठिकाणी गणेशाची मूर्ती स्थापन करणार आहेत. यात श्रीनगर, लाल चौक, पुलवामा, कुपवडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुरआमा, सोफियाम याठिकाणी होणार गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न

याशिवाय आठही गणेश मंडळ मिळून पुण्यात मोरया कार्यकर्ता मंच स्थापन करणार आहेत. ज्यामध्ये कार्यकर्त्यांना रोजगार देण्यासाठी मंडळ प्रयत्न करणार आहेत. त्यासोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांना तीन ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील सगळ्या मंडळांनी गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा असं अहवान करण्यात आले असून, अशा मंडळांचा गौरव सगळे मिळून करू असंही या आठ गणेश मंडळांनी सांगितले आहे.