AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudipadwa 2026 : गुढीपाडव्याच्या उत्साहाला सुरूवात, शोभायात्रा सुरू, मुंबई, ठाणे, नागपूसह…

राज्यात आज गुढीपाडव्यानिमित्त लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. ठिकठिकाणी शोत्रा यात्रेंचे आयोजन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथील शोभा यात्रेत सहभागी झाले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील शोभा यात्रेत सहभागी झालेत.

Gudipadwa 2026 : गुढीपाडव्याच्या उत्साहाला सुरूवात, शोभायात्रा सुरू, मुंबई, ठाणे, नागपूसह...
Gudhi Padawa Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Mar 19, 2026 | 6:17 PM
Share

नागपूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. दुसरीकडे ठाण्यातही शोत्रा यात्रेचे आयोजन करणयात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शोभा यात्रेला हजेरी लावली. राज्यात गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी शोभा यात्रा काढल्या जात आहेत. नागपूरमधील शोभा यात्रेनिमित्त सामूहिक राम रक्षा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे आपण आपलं नववर्ष साजरे करण्यासाठी आलो आहोत. हा आपल्यासाठी मोठा उत्सव आहे. नवसंकल्प घेऊन आता पुढे जाऊ. पारंपरिक वेषात आपण येतात आणि या ठिकाणी भगवामय वातावरण झालं. ही गुढी भारताची गुढी आहे मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी अशा शुभेच्छा देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

डोंबिवलीत स्वागत यात्रेत महिला रायडर्सचा जलवा. गुढी उभारत परंपरेला आधुनिकतेची जोड. पारंपरिक वेशात महिला रायडर्स व सायकलस्वारांचा मोठा सहभाग बघायला मिळतोय. मोटरसायकलवर गुढी उभारत अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. नव्या पिढीकडून परंपरेचे जतन केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा वेगळा सहभाग दिसतोय. डोंबिवलीत शोभायात्रेला आधुनिकतेची झलक दिसत आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय. साडेतीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली. देवीची पहाटे 4 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पुजा करुन गुढी उभारण्यात आली.

तुळजापूर मंदीरावर गूढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात घरोघरी गुढी उभी करण्याची परंपरा आहे. आज सकाळी तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिर या ठिकाणाहून पालखी सोहळा सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह भाजप आमदार संजय केळकर ,निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के देखील उपस्थित आहेत. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त असल्याने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेचा गाभारा ,सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना देशी विदेशी आकर्षक अशा फुलांची सजावट.

डोंबिवलीत गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा भव्य आकर्षण पाहायला मिळाले. नेहरू मैदानात तब्बल १५० फूट उंच महाकाय गुढी उभारण्यात आली असून ती संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या गुढीला “विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक” असे संबोधले.

यंदा या नववर्ष स्वागत यात्रेचे २८ वे वर्ष साजरे करण्यात आले. ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त विशेष चित्ररथ साकारण्यात आले, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “क्रांतिकारी देशसेवक” या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धेत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली. डोंबिवलीत यंदाचा गुढी पाडवा उत्सव सांस्कृतिक आणि देशभक्तीच्या रंगात रंगला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी