कोंबड्या, शेळ्यांवर अत्याचार, एका महिलेवरही…भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप!

पुण्यातील भोर तालुक्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीबाबात खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्याने याआधी हादरवून टाकणारे कारनामे केले आहेत.

कोंबड्या, शेळ्यांवर अत्याचार, एका महिलेवरही...भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप!
pune bhor news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2026 | 3:43 PM

Pune Bhor : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे आम्ही या प्रकरणी कठोर पावलं उचललेली असून या प्रकरणातील दोषी व्यक्तीला सोडणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. दरम्यान, एकीकडे या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असताना याच प्रकरणातील आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची धक्कादायक माहितीस समोर आली आहे. त्याला गावातून 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं, त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे.

20 वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले

भोर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव भीमराव कांबळे असे आहे. याच आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा आरोपी पहिल्यापासून विकृत प्रवृत्तीचा आहे. त्याच्या अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे त्याला गावकऱ्यांनी 20 वर्षांपूर्वीचं गावातून हाकलून दिले होते. सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेही हे या ठिकाणी राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सध्या त्याच्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

65 वर्षीय महिलेवरही बलात्कार, कोंबडी, शेळ्यांवरही अत्याचार

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी अगोदरपासूनच विकृत प्रवृत्तीचा होता. गावकऱ्यांनी त्याच्या कथित विकृतींचा पाढाच वाचला आहे. आरोपीने गावातील शेळ्या, कोंबड्यांवरतीही अत्याचार केलेला आहे, असे तेथील लोकांनी सागितले आहे. अशा या विकृताला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याच्या गावकऱ्यांकडून केली जात आहे. या आरोपीने त्याच्या स्वतःच्या मुलीवरसुद्धा अत्याचार केले होते, अशीही खळबळजनक माहिती समोर येत आहे. याच क्रूर आरोपीने गावातील 65 वय असणाऱ्या महिलेवरही बलात्कार केला होता. गावातील शेतात जाणाऱ्या अनेक महिलांवर त्याची वाईट नजर असायची. अनेक वेळा त्याने या महिलांसोबत गैरकृत्य केले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ही प्रकरणं समोर आली नाहीत, असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सध्या याच नराधमाच्या नसरापूरच्या कृतीने गावात दहशत पसरली असून गावातील महिला, मुली घाबरलेल्या आहेत. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Follow Us