AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhor Crime: फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या…4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर नरसापुर ग्रामस्थ संतप्त

Pune Bhor Narasapur Crime: भोर तालुक्यातील नरसापूर इथं 65 वर्षांच्या विकृताने चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या नराधमाला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या म्हणत सकाळपासून आंदोलन करण्यात येत आहे. काय आहे मोठी अपडेट?

Bhor Crime: फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या...4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर नरसापुर ग्रामस्थ संतप्त
नरसापूर ग्रामस्थ आक्रमक, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 02, 2026 | 1:08 PM
Share

Pune Bhor Narasapur Morcha: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येने सर्वच हादरले. 65 वर्षांच्या विकृताला पोलिसांना तातडीने अटक केली. पण या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. तर आज गावकऱ्यांना मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे रुपांतर आंदोलनात झाले असून आरोपीला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढत आहे. या घटनेने गावात तणाव वाढला आहे. गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली आहे.

गोठ्यात नेऊन अत्याचार

65 वर्षांच्या आरोपीने चार वर्षांच्या चिमुरडीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी या चिमुरडीला सोबत नेतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. आरोपीवर यापूर्वी सुद्धा विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. ही घटना समोर येताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात देण्यात यावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. कालही त्यांनी रास्ता रोको केला होता. तर आज ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

आरोपीला ताब्यात द्या, फाशी द्या

गावातील नराधमाला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या या मागणीसाठी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी नरसापूर ग्रामपंचायत कार्यालयापासून ते पुणे-सातारा महामार्गापर्यंत मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आरोपीला ताब्यात द्या अनथ्या फाशी द्या ,तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही, अशा नराधमांमध्ये दहशत बसणार नाही अशा प्रतिक्रिया दिला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मोर्चेकरी आक्रमक होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस त्यांची समजूत काढताना दिसत आहे.

तर याप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिसांना प्रकरणात कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. पण ग्रामस्थ अजूनही ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याचे दिसते. या मोर्चात महिलांचा मोठा समावेश असून आरोपीला ताब्यात देण्याची मागणी मोर्चेकरी करत आहे. पोलीस प्रशासन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेने ग्रामस्थ हादरले आहेत. जोपर्यंत अशा आरोपींना कडक शासन होत नाही, नराधमांच्या मनात दहशत निर्माण होत नाही. तोपर्यंत असा घटना थांबणार नसल्याची प्रतिक्रिया मोर्चातील महिलांनी दिली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं