Pune Rave Party Case : पोलिसांनी रक्ताचे रिपोर्ट न बदलल्यास…रेव्ह पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाचा मोठा दावा!

पुण्यातील रेव्ह पार्टीच्या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. आता त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं आहे.

Pune Rave Party Case : पोलिसांनी रक्ताचे रिपोर्ट न बदलल्यास...रेव्ह पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाचा मोठा दावा!
pune rave party case
| Updated on: Jul 27, 2025 | 5:32 PM

पुण्यातल्या खराडी भागातली एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी चालू होती. याच पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. आता खेवलकर यांनी मी अमली पदार्थाचे सेवन केलेच नाही, असा न्यायालयात दावा केलाय.

खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. या रेव्ह पार्टी प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी प्रांजल खेवलकर यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. तर खेवलकर यांना कोठडी सुनावण्याची आवश्यकता नाही, असं मत त्यांच्या वकिलांनी मांडलं आहे.

वकिलाने नेमकी काय बाजू मांडली?

रेव्ह पार्टी प्रकरणात न्यायालयात सुनावणी चालू झाल्यानंतर सरकारी वकिलाने त्या पार्टीमध्ये कोकेन आणि गांजा सापडला आहे, असा दावा केला. तसेच या सर्व वस्तू कुठून आल्या, कशासाठी आणल्या होत्या तसेच कोणाकडून आणण्यात आल्या याचा तपास करायचा आहे, असे सांगत खेवलकर यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.

3 वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला

सरकारी वकिलाचा हा युक्तिवाद खेवलकर यांच्या वकिलाने खोडून काढला. यापूर्वीदेखील खेवलकर यांना 3 वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. खेवलकर यांचे राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा खेवलकर यांच्या वकिलांनी केला. तसेच राजकीय द्वेष आणि माझ्या यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जातोय, असा दावाही खेवलकर यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून केला.

रक्त चाचणीचा रिपोर्ट बदलला नाहीतर…

तसेच, पोलिसांनी हा सगळा ट्रॅप लावला असावा. कारण यापूर्वी दोन ते तीन वेळा माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पोलीस कोठडी कशासाठी हवीय आहे. कारण त्याची गरज नाहीये, अशी बाजू खेवलकर यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मांडली. तसेच पोलिसांनी जर रक्त चाचणीचा रिपोर्ट बदलला नाहीतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची नशा केलेली दिसणार नाही, खेवलकर यांनी कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केलेल नाही, असा मोठा दावा खेवलकर यांच्या वकिलाने काल आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार? पोलिसांच्या तपासातून नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.