महादेव जाणकरांची शांतीत क्रांती, पुणे शिक्षकमध्ये महायुतीचं टेन्शन वाढलं, चिंता वाढवणारे आकडे आले

राज्यात पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे आता भाजपाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. महादेव जाणकर यांनी मोठी खेळी केली आहे.

महादेव जाणकरांची शांतीत क्रांती, पुणे शिक्षकमध्ये महायुतीचं टेन्शन वाढलं, चिंता वाढवणारे आकडे आले
Mahadev Jankar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 7:53 PM

राज्यात 23 ऑक्टोबर रोजी पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान झालं होतं. ज्यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा देखील यामध्ये समावेश आहे. दरम्यान या पाचही जांगासाठी मतमोजणी सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामधून आता मोठी बातमी समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार या मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार  दत्तात्रय सावंत हे आहेत. या मतदारसंघात सध्या कौस्तुभ गावडे आणि दत्तात्रय सावंत यांच्यामध्ये अटितटीचा सामना सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. कोणत्याही क्षणी आकडे फिरण्याची शक्यता आहे.  तर शिवसेना शिंदे गटाने ऐनवेळी पाठिंबा दिलेले सचिन सानप हे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना महादेव जाणकर यांच्या रासपकडून पांठिबा जाहीर करण्यात आला होता. या मतदारसंघात दत्तात्रय सावंत यांनी आपली संपूर्ण ताकद लावल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीमुळे या मतदारसंघात भाजपाचं टेन्शन वाढलं आहे. अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यामध्ये मोठी चुरस पहायला मिळत आहे. सावंत यांना रासपकडून पाठिंबा देण्यात आला होता.

Loading...

शिंदेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर  

दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजप सोबतच शिवसेना शिंदे गटाकडून देखील दावा करण्यात आला होता. मात्र ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा होती. दरम्यान ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला. सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.  त्यामुळे पुण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्व लढत होती. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन सानप हे तिसऱ्या क्रमाांकावर आहेत. या विधान परिषदेच्या जागेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us