AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : लिव्हर ट्रान्सप्लांट जीवावर बेतलं, दुसऱ्याच दिवशी पतीचा मृत्यू, 8 दिवसांनी पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास

पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात झालेल्या लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर ती-पत्नीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीने पतीला लिव्हर दान केले होते. ऑपरेशननंतर दोघांचाही मृत्यू झाल्याने रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप आहे. नातेवाईकांनी रुग्णालय आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Pune News : लिव्हर ट्रान्सप्लांट जीवावर बेतलं, दुसऱ्याच दिवशी पतीचा मृत्यू, 8 दिवसांनी पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास
लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन जीवावर बेतलं, पती-पत्नीचा मृत्यू
| Updated on: Aug 23, 2025 | 8:48 AM
Share

पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही पती-पत्नीच्या जीवावार बेतल्याचे उघड झाले आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशननंतर पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायाक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॅास्पिटल मधील ही घटना आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असे मृत पती पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात रुग्णालयाने हलगर्जीपणा केला आरोप कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॅास्पिटलवर लावला आहे.

बुधवारी ऑपरेशन आणि दुसऱ्याच दिवशी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बुधवारी, बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली. त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनीच बापू यांना स्वतः चे लिव्हर दान केले होते. मात्र बुधवारी हे ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत, शुक्रवारी बापू कोमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेदजनक गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूला आठ दिवस होतात न होतात तोच त्यांची पत्नी कामिनी यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच कामिनी यांचाही सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला.

यामुळे कोमकर कुटुंब अतिशय शोकाकूल आहेत. सह्याद्री हॅास्पिटल आणि तेथील डॅाक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला, त्यामुळेच आधी बापू कोमकर व नंतर त्यांची पत्नी कामिनी यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सह्याद्री हॅास्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॅाक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी  मागणी कोमकर यांच्या शोकाकुल नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तापस सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच