AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय, जीव देणार तोच… पोलीस मार्शलने असा वाचवला तरुणाचा जीव

Pune Police : कौटुंबिक वादातून जीव द्यायला चाललेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीला पोलीस मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी या व्यक्तीला वाचवले आहे.

कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय, जीव देणार तोच...  पोलीस मार्शलने असा वाचवला तरुणाचा जीव
Man SSImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 09, 2026 | 2:56 PM
Share

घरगुती वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणाला पुण्यातील सिंहगड रोडवरच्या नांदेड सिटी पोलीस मार्शलने धाडसी कारवाई करत वाचवले असल्याची बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जीव द्यायला चाललेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीला पोलीस मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. लोहगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या काही वेळात या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय

कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या प्रदीप दीपकराव चंदनशिव या 39 वर्षीय व्यक्तीचा जीव नांदेड सिटी मार्शलच्या सतर्कतेमुळे वाचला आहे. प्रदीप हे घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या विचारात होते. या संदर्भातील माहिती मिळताच लोहगाव पोलीस ठाण्याने नांदेड सिटी मार्शल पोलीस खराडे आणि होमगार्ड राऊत यांना त्वरित कळवले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे या व्यक्तीची मनस्थिती खराब असल्याचे पोलिसांना समजले.

पोलीसांनी लोकेशन केले ट्रॅक

पोलीसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तांत्रिक मदतीने त्याचे लोकेशन मिळवले आणि घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला तो व्यक्ती सापडला नाही, मात्र त्यावेळी पोलीसांनी आसपास काम करत असलेल्या शेतकऱ्यांना या व्यक्तीचे वर्णन सांगतले. त्यावेळी शेतकऱ्यांनी लाल कपडा असलेला इसम चारचाकी गाडीसह गेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या दिशेला पाठलाग केला. अखेर वर्णनाप्रमाणे सदर व्यक्ती मिळून आली.

पोलीस मार्शनचे कौतुक

या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने घरगुती त्रासामुळे आत्महत्या करण्यास आल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुरक्षितपणे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे आणले. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली, त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. या सर्व प्रकरणावर बोलताना नांदेड सिटी पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी म्हटले की, लोहगाव पोलिसांकडून माहिती मिळताच आमच्या मार्शलनी तत्परतेने काम केले. वेळेत लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मदतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचवता आले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी