“TET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करा”, अजित पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 09, 2022 | 8:11 AM

अजित पवार म्हणतात...

TET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करा, अजित पवारांची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात (TET Scam) जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींची नावं आहेत. हीनाकौसर अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार यांची नावं या यादीत आहेत. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अश्यात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “TET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करावी. यात जे दोषी आढळतील त्यांना कठोर शासन व्हावं. ज्याची चूक असेल ते कळावं आणि कुणाची चूक नसेल तर तेही समोर यावं. पण या घोटाळ्याबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता, खोलवर जाऊन चौकशी करावी अन् खरं चित्र लोकांच्या समोर यावं. दोषींवर कारवाई व्हावी”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काही नाही सांगणार सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. काय सांगायचं काय बोलायचं संपूर्ण जनतेची फसवणूक झाली आहे. ईडी काडी लावून नेत्यांना आत घेतलं गेलं. या सगळ्यांना आता काय बोलायचं सरकार म्हणून काय करत केंद्र काय करत संविधान म्हणून काय सगळी तोडामोड सुरु आहे, असं पेडणेकर म्हणल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आज मंत्रिमंडळ विस्तार, सत्तारांचा पत्ता कट?

आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय. यात माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही मोठं खातं मिळण्याची शक्यता होती. पण याआधीच म्हणजे कालच त्यांच्यासमोर संकट उभं ठाकलं. TET घोटाळ्यात त्यांच्या मुलांची नावं समोर आलं. अन् त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का हे पाहावं लागेल. शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल. आज 20-22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपला 24 तर शिंदेगटाला 18 मंत्रिपदं असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे. सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती शिंदे गटाकडे राहणार असल्याची चर्चा आहे. तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, अशी चर्चा आहे. फडणवीसांचा गृहविभागात दबदबा आहे. अश्यात गृहखातं त्यांच्याकडेच राहणार असल्याचं जवळजवळ फिक्स आहे.