पुण्यात अपघाताचा थरार; कारच्या धडकेत आयटी इंजिनीअर ठार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली. पाषाण रोडवरील अपघातात एका इंजिनीअरचा मृत्यू झाला. या प्रकरणी 19 वर्षीय चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अपघाताचा थरार; कारच्या धडकेत आयटी इंजिनीअर ठार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
pune accident
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 12:22 PM

पुण्यातील अपघाताच्या मालिका सुरू आहे. पुण्यातील नवले पूल असो कल्याणीनगर… भीषण अपघात सुरूच आहे. आयटी हब म्हणून नावारुपाला आलेल्या शहरात पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात एका आयटी इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारच्या धडकेत वीरेंद्र द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पुण्यातील पाषाण रोडवर झालेल्या अपघातात वीरेंद्र द्विेवेदी यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय कार चालक ईशान विशाल शेठिया याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाषाण रोडवर भरधाव धडकेच 48 वर्षीय वीरेंद्र हे ठार झाले. अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी सात वाजता पाषाण येथील हनुमान मंदिराजवळच्या नेकलेस गार्डनजवळ घडली. या अपघात प्रकरणी 19 वर्षीय काल चालक ईशानवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वीरेंद्रचा भाऊ धीरेंद्र द्विवेदी याने त्याच्या विरोधात
तक्रार दाखल केली.

वीरेंद्र हे हिंजवडीत विप्रो कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून कामाला होते. ते शनिवारी सकाळी एनडीएकडून पाषाणकडे मॉर्निंग वॉकला निघाले. त्याचेवेळी ईशान विशाल शेठिया याची कार पाठिमागून त्यांना धडकली. कारच्या भरधाव धडकेत वीरेंद्र रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर जागीच कोसळले. इशान आणि विरेंद्र यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु औध रुग्णालयात दाखल केलेल्या वीरेंद्र यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इशानचे वडील एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतात. तर इशान हा पुणे-मुंबई महामार्गावरील ऑक्सफोर्ड महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो घटनेच्या दिवशी महाविद्यालयातून घरी चालला होता.

अपघाताची सखोल चौकशी कऱण्याची मागणी

विरेंद्र द्विवेदी या आयटी इंजीनिअरच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या 19 वर्षांच्या ईशान विशाल शेठिया या तरुणाला अटक न करता फक्त नोटीस बजावून पोलिसांनी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. अपघातानंतर ईशान पळून गेला नाही आणि त्याने स्वतःच्या गाडीतून विरेंद्र द्विवेदी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे त्याला अटक करण्याची गरज नाही, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र विरेंद्र द्विवेदी यांच्या मित्रांनी यांवर आक्षेप घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाला फक्त नोटीस बजावून सोडून दिल्याने चुकीचा संदेश जाईल, असं विरेंद्र द्विवेदी यांच्या मित्रांचं म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us