AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं, अपडेट काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. या दोघांमध्ये काय खलबतं झाली याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं, अपडेट काय?
अमित शाह, एकनाथ शिंदेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 13, 2026 | 12:52 PM
Share

Amit Shah and Eknath Shinde Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट झाली. हे दोन्ही नेते एकाच वाहनातून आले. या दोघांमध्ये अर्ध्या तासाहून अधिक काळ खलबतं झाली. गेल्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेट होत आहे. यापूर्वी रक्षा बंधनानंतर दोन्ही नेत्यांनी विमानतळावर हितगुज साधले होते. सध्या सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची यावरून सुनावणी सुरू आहे. त्यात शिंदेंच्या बाजूने युक्तीवाद सुरू आहे.

फडणवीस आणि शिंदेही उपस्थित

फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला अमित शाह भेट देणार आहे. ⁠परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी अमित शाह हे संवाद साधणार आहेत. सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ दर्जा देण्याची मागणी केंद्राकडे प्रलंबित आहे. गेल्या चार वर्षांपासून ही मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. अमित शाहांच्या भेटीमुळे प्रलंबित मागणीला बळ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. अमित शाहांच्या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे. पा. वा. काणे लिखित पाच खंडांतील ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ संस्थेत जतन करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या उगमाशी धर्मशास्त्राचा संबंध असल्याने या ग्रंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अर्धा तास एकत्र गाडीत प्रवास

केंद्रीय गृहमंत्र्यांची शिंदे यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी अर्धा तास एकत्र गाडीत प्रवास केला. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. चर्चेचे पेव फुटले आहेत. अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दोघांमध्ये राज्यातील घडामोडी आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. शाह हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दाखल झाले आहे. ते लालबागचा राजा आणि चिंचपोकळीची चिंतामणीच्या दर्शनाला जाणार आहेत. दरम्यान दोन्ही नेत्यांमधील या बैठकीमुळे पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले आहे.

Follow Us
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित