पुण्यात ‘बापट’ इफेक्ट, पोलिसांनी 150 गणेश मंडळांना रस्त्यावरून मिरवणूक परवानगी नाकारली; रवींद्र धंगेकर आक्रमक
पुण्यात १५० गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. यावरून रवींद्र धंगेकर आक्रमक झाले असून ११ वाजता गणेश मंडळांना घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

पुण्यात काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदुषणावरून गणेश मंडळाच्या रस्त्यावरील मिरवणुकीला विरोध केला होता. या विरोधामुळे विद्यानंद बापट यांना मारहाणही सहन करावी लागली. परंतु आता त्यांच्या मागणीला पोलीस प्रशासनाकडून ग्रीन सिग्नल दिल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी थेट 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. यावरून रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मंगळवारी 11 वाजता गणेश मंडळांना घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सव सुरू केला. तेव्हाची मोठी लोक होती, त्यांनी एका भावना, विचारातन गणेशोत्सव सुरू केला. सगळ्याच उत्सहात गालबोट लागतं का, चुकीच्या प्रथा असतात का, जर असेल तर सुधारण्याचा कार्य राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. प्रथा बंद करून किंवा मिरवणूक बंद करून…अथवा आधी आपण ज्यांना पोलीस परवानगी द्यायचो. त्याना परवानगी रद्द करणे गैरसोयीचे आहे. लोकांना विचारात घ्यावा लागेल’.
‘आज कार्यकर्त्यांमध्ये दरी पडली आहे. श्रीमंत आणि गरीब….अशी दरी ही चुकीचे वक्तव्ये, काही लोकांनी केलेलं आक्रमण तर काहींनी उद्योगपतींचा आणलेला पैसा…ही बाजू बघितल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनांमध्ये बदलू लागल्या आहेत. आमचे मंडळ गरीब असल्याने दुजाभाव करत असल्याचे बोलले जात आहे. गरीब असल्याने मंडळांच्या परवानग्या नाकारल्या आहेत. काल अनेक कार्यकर्ते भेटले. त्यांनंतर सबंधित अधिकाऱ्यांची बोललो. ही प्रथा चाल करा. तुम्ही शिस्त आणि नियम लावा. तुम्ही उत्सव बंद करू नका. उत्सव कमी करता कामा नये. गणेशोत्सवाला मर्यादा येत आहेत. अनेक निर्बंध येत आहेत. विचारवंत आणि अधिकारी येतात, त्यांना काहीतरी करायचं असतं, असे रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले. तत्पूर्वी धंगेकरांनी पुणे पोलिसांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गणेश विसर्जनाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस १५० गणेशमंडळांंना परवानगी देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.