AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत पकडलं, आता खडसेंच्या जावयावर खळबळजनक आरोप, भाजपा आमदाराचा मोठा दावा

एकनाथ खडसे यांचे जावई हे रेव्हा पार्टीत रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत पकडलं, आता खडसेंच्या जावयावर खळबळजनक आरोप, भाजपा आमदाराचा मोठा दावा
pune rave party Pranjal Khewalkar
| Updated on: Jul 27, 2025 | 7:26 PM
Share

Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. खराडी येथे एका घरात चालू असलेल्या या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई रंगेहाथ पकडले गेले आहेत. या पार्टीत गांजासदृश पदार्थ तसेच दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

मंगेश चव्हाण यांची बोचरी टीका

सध्या खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीत सापडल्याने भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर येत कठोर टीका केल आहे.

प्रांजल खेवलकर यांनीच पार्टी आयोजित केली

या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही. कारण त्या रेव्ह पार्टीत खडसे यांचे जावई होतो ही वस्तूस्थिती आहे. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच ती पार्टी आयोजित केली होती. कारण त्यांच्याच नावाने तो फ्लॅट बुक करण्यात आला होता. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

तसेच पुढे बोलताना, ड्रग्जच्या तस्करीत खडसे यांच्या जावयाचाही संबंध असलाच पाहिजे, असा खळबळजनक दावा मंगेश चव्हाण यांनी केला आहे. खडसे यांच्यासारख्या परिवारातील एखादी व्यक्ती रेव्ह पार्टीत सापडली असेल तर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खडसे यांचे अनेक महिलांशी लैंगिक संबंध

दरम्यान, याच मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी लैंगिक संबंध होते. त्या महिला खडसे यांच्याकडे रात्र-रात्र येऊन राहायच्या. सकाळी लोक या महिलांना सोडायला जायचे. हे सगळं काही बघणारा व्यक्तीच सांगत होता असा दावा मंगेश चव्हाण यांनी केला होता. दरम्यान, खडसे यांचे जावई सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. या चौकशीतून काय समोर येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?