मित्रांसोबत राजगड किल्ला पाहायला गेला; मित्र बालेकिल्ल्यावर पोहोचले, पण तो पाली दरवाजाजवळच… दुर्दैवी घटना समोर

Rajgad Fort Tourist Death News: राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा पाली दरवाजाजवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

मित्रांसोबत राजगड किल्ला पाहायला गेला; मित्र बालेकिल्ल्यावर पोहोचले, पण तो पाली दरवाजाजवळच... दुर्दैवी घटना समोर
| Updated on: Oct 11, 2026 | 5:01 PM

पुण्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा पाली दरवाजाजवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर वय ३४ (रा.फुरसुंगी पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. तीव्र उन्हामुळे चक्कर आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे व्यक्तीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिज्ञेश खांडाळकर हे आपल्या तीन मित्रांसह राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ल्यावरील पाली दरवाजाजवळ ते अचानक चक्कर येऊन पडले. यावेळी त्यांचे मित्र हे बालेकिल्ल्यावर पोहोचले होते. या घटनेची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी दीपक पिलावरे, विशाल पिलावरे, महावितरणचे कर्मचारी शंकर रसाळ, चेतन चोरगे तसेच स्थानिक नागरिक आकाश जाधव, सुभाष जाधव आणि लहू यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Loading...

संबंधित व्यक्तीला तत्काळ सीपीआर (CPR) देऊन मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्यांना राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आले. १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका किल्ल्याच्या पायथ्याशी खंडोबा माळावर बोलावण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी त्यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते हेही घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी कुरणकर यांनी जिज्ञेश यास मृत घोषित केले. यानंतर याची माहिती पर्यटकांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  उन्हाची तीव्रता असताना गड-किल्ल्यांवर चढाई करताना पुरेसे पाणी पिणे, वेळोवेळी विश्रांती घेणे आणि प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तातडीने मदत घेणे आवश्यक आहे, असे वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते म्हटले. यानंतर गड कोटांच्या पायथ्याशी रुग्णवाहिका उपलब्ध असणे. तसेच आणि प्राथमिक उपचाराची सोय उपलब्ध व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us