Pune Lal Mahal : लाल महालातला ‘तमाशा’ भोवला! तिघांवर पुण्यातल्या फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल; काय घडलं? वाचा…

| Updated on: May 21, 2022 | 10:11 AM

वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

Pune Lal Mahal : लाल महालातला तमाशा भोवला! तिघांवर पुण्यातल्या फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल; काय घडलं? वाचा...
लाल महालाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेने यासंबंधी तक्रार केली होती. यानुसार वैष्णवी पाटीलसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनीही यावर संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुरक्षारक्षकाला हाताशी धरून रीलचं शूट करण्यात आले होते.

‘नाचगाण्याचे प्रकार निषेधार्ह’

लाल महाल पर्यटकांसाठी आहे, की रील्स बनवण्यासाठी असा संतप्त सवाल काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आहे. ते म्हणाले, की हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी काल केली होती.

हे सुद्धा वाचा

पायऱ्यांवर आंदोलन

लाल महालातील गाण्याच्या शूट आणि रील्सचा विरोध संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला होता. लाल महालाच्या पायऱ्यांवर बसून जय जिजाऊ, जय शिवराय, संभाजी राजांचा जयजयकार अशा घोषणा आंदोलकांनी केल्या, एवढेच नाही तर मराठा महासंघातर्फे लाल महालाचे शुद्धीकरणही करण्यात येणार आहे. आज हे शुद्धीकरण केले जाणार आहे. याठिकाणी गाण्याचे शूट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून शिक्षा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.