Pune-Mumbai Expressway Accident | पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील अपघाताचा फटका जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीला ; वाहातूक कोंडी फोडण्याचे काम सुरू

ऑईल टँकर पलटून अपघात झाला. टँकरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्याने रस्त्याने चाललेला दुसरा टँकरही घसरून पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. .

Pune-Mumbai Expressway Accident | पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील अपघाताचा फटका जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीला ; वाहातूक कोंडी फोडण्याचे काम सुरू
जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुक कोंडी Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 1:49 PM

पुणे- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर(Pune-Mumbai Expressway) झालेल्या अपघाताचा (Accident) फटका जुना पुणे मुंबई महामार्गावर दिसून येत आहे. पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गवर जाणारी जड वाहतूक ही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर (old Mumbai-Pune highway) वळविल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्मण झाले आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तळेगांव दभाडे टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.  3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्णय झाली आहे. द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत झालेल्या या अपघाताला आठ तास उलटून गेलेत. परंतु अद्यापही पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका विस्कळीत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागणार आहे. अशी माहिती अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

ऑईलमुळे दुसराही टॅंकर कोसळला

ऑईल टँकर पलटून अपघात झाला. टँकरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्याने रस्त्याने चाललेला दुसरा टँकरही घसरून पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीसही घटना स्थळावर कार्यरत झाले आहेत.महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्याचे व ऑईलमुळे वाहने घसरून अधिकचे अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबईकडे येणाऱ्यांना त्रास

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. यामुळे आधीच या मार्गावर वाहतूक जास्त असते. त्यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर हा अमृतांजन ब्रीजजवळ टँकर पलटलटल्याची माहिती आहे.

महामार्गावर अपघाताच्या घटना

मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. डेकोरेशन साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीला भाषण अपघात घडल्याची घटना तीन आठवड्यापूर्वी घडली होती. मुंबई पुणे महामार्गावर गाडीच्या टपावरुन प्रवास करणारे तब्बल 22 जण भर रस्त्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाला होता.

राजकारण जाईल चुलीत, पण इथलं गव्हर्नन्स ठीक रहावं, आता त्यालाच बट्टा लागतोय

Supreme Court : दिव्यांगांसाठी खुशखबर, दिव्यांगही IPSसाठी अर्ज करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुलीची घोड्यावरून वरात काढत सांगळे कुटुंबीयांकडून स्त्री पुरूष समानतेचा संदेश

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.