AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत अजित पवार यांचं सूचक विधान, म्हणाले…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार की नाही याकडे अनेकांचं लक्ष आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत अजित पवार यांचं सूचक विधान, म्हणाले...
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 24, 2021 | 5:08 PM
Share

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार की नाही याकडे अनेकांचं लक्ष आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देशगी अजित पवारांनी दिले. ते पुणे विधानभवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठकीच बोलत होते.

“कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा”

अजित पवार म्हणाले, “कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधिक गतीमान करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”

“पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखांचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब”

“पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये 55 लाखाचा टप्पा पार केला ही समाधानाची बाब आहे. एका दिवसात एक लाखाहून अधीक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले. मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही. लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कोरोनामुक्त गावांचा अनुभव इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा कोरोनामुक्त गावांचा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, डॉ.सुभाष साळुंखे यांनीही काही सूचना केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार शरद रणपिसे, आमदार राहुल कुल, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम, आदि मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

पुण्यातील अटल भूजल योजनेच्या कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या; पालकमंत्री अजित पवारांच्या सूचना

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

भारतातील पहिला मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे लॉन्चिंग; अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on corona restriction in Pune and Pimpri Chinchwad

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...