भारतातील पहिला मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे लॉन्चिंग; अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

पुण्यातील हायटेक कंपनी अ‍ॅक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूतचे’ अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

भारतातील पहिला मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे लॉन्चिंग; अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
Ajit Pawar

पुणे : पुण्यातील हायटेक कंपनी अ‍ॅक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूत’चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाऑईस ‘एएफ-100’ व ‘एएफ-60’ या मशिनचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. (Ajit Pawar launched India’s first mobile oxygen plant Pranavayudut launched)

पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अ‍ॅक्युरेट गेजिंग एजिमेडचे व्यवस्थापकिय संचालक विक्रम साळुंखे, संचालक संभाजी दिवेकर, रवीशंकर कुलकर्णी, दिलीप काटकर, प्रविण थोरवे, सतिश एम, स्वाती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट हा प्राणवायूदुत 250 एल. पी. एम. (लिटर प्रति मिनिट) क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील 20 ते 50 बेडच्या हॉस्पिटलची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून, हा 30 मिनिटांच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान/जी. पी. एस. ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय. ओ. टी.) मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ठरतो.

प्राणवायूदूत हा पूर्ण मोबाइल, ट्रेलर आरोहित (माउंटेड) आणि कंटेनरमध्ये अशा तीन प्रकारात येतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या साहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपात्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणे सहज शक्य होणार आहे. प्राणवायूदुतमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलेंडर्स भरण्यासाठीही वापरता येतो.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका नंदा लोणकर यांच्यातर्फे कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर प्रशांत जगताप व पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक

(Ajit Pawar launched India’s first mobile oxygen plant Pranavayudut launched)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI