मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक

टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करुन हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला उत्तर देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाढदिवसाच्या व्हिडिओसारखा आरोपीचा व्हिडीओ तयार करत उत्तर दिलं.

मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी 'रावण' टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक
रावण टोळीतील सहा जणांना अटक

पिंपरी चिंचवड : रावण टोळीच्या प्रमुखाच्या जन्मदिवसानिमित्त शस्त्रासह एकत्र आलेल्या सहा गुन्हेगारांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा मृत्यू झाला आहे. पण आपल्या टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करुन हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला ‘रिप्लाय’ देणार होते.

काय आहे प्रकरण?

अनिकेत जाधवचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या सहा गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यामध्ये रावण टोळीतील प्रमुख आरोपी आणि मयत अनिकेत जाधव याचा भाऊ अनिरुद्ध ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव हा देखील होता.

नेमकं काय घडलं?

टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करुन हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला उत्तर देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाढदिवसाच्या व्हिडिओसारखा आरोपीचा व्हिडीओ तयार करत उत्तर दिलं. अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजू जाधव, धीरज दीपक जयस्वाल, रोहन राजेंद्र कांबळे, अमित भगिरथ मल्लाव, मंगेश देवीदास नाटेकर, अक्षय लहू चौगुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अनिरुद्धकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळला. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साताऱ्यात तलवारीने केक कापणारा गुंड ताब्यात

गाडीच्या बोनेटवर बसून गुंडाने तलवारीने केक कापल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील चंदन नगर परिसरात उघडकीस आला होता. गुंड वैभव जाधवने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून वैभवने बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्यानंतर तलवारीने केक कापत त्याने उन्मादाचं प्रदर्शन केलं. यावेळी जोरजोरात गाणी लावून गुंडाच्या 15 ते 20 मित्रांनी रस्त्यावर नाच केल्याचा प्रकारही घडला. ‘मरने से मै कभी डरता नहीं, बादशाह ओ बादशाह’ या गाण्यावर जल्लोष करत तलवारीने केक कापतानाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. सातारा शहरात वैभव जाधववर याआधी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

(Pune Ravan Gang gathers on Birth Anniversary of Late Leader Aniket Jadhav at Pimpri Chinchwad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI