‘हे गुन्हेगारी कृत्य’, रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात अजित पवार गटाची तक्रार, निवडणूक आयोग कारवाई करणार?

अजित पवार गटाने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

'हे गुन्हेगारी कृत्य', रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात अजित पवार गटाची तक्रार, निवडणूक आयोग कारवाई करणार?
रविंद्र धंगेकर आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 7:28 PM

पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे ला मतदान पार पडणार आहे. पुण्यात चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आलीय. इतर पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही आहेत. पण खरी लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात आहे. ही लढत सुरु असताना दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदारांची दिशाभूल करणे आणि आमचं चिन्हं वापरणे हे गुन्हेगारी कृत्य आहे, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचं साहित्य जप्त करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव गर्जे यांनी तक्रार दखल केली आहे.

पुण्यात काँग्रेसचे 10 आमदार ठाण मांडून

दरम्यान, पुण्याच्या काँग्रेस कार्यालयातून रोज 5 हजार मतदारांना फोन केला जातोय. फिल्डवरील प्रचारासोबतच हायटेक पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. त्यासोबत पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत केल्याने, विदर्भातील 10 काँग्रेस आमदारांवर इथली जबाबदारी सोपवण्यात आलीय. सध्या विदर्भातील 10 काँग्रेस आमदार पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. एकूणच पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकद पणाला लावलीय.

पुण्यात ॲाटोरिक्षामधून गल्लोगल्ली प्रचार

पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. इथे दोन्ही पक्षांकडून प्रत्येक परिसरात गल्लोगल्ली प्रचारासाठी ॲाटोरिक्षांचा प्रभावी वापर केला जातोय. दोन्ही पक्षाच्या प्रचार करणाऱ्या ॲाटोरिक्षा समोर आल्यावर, त्या ॲाटोरिक्षांचे चालक आपआपल्या उमेदवारांच्या विजयाचे दावे करतायत. भाजपचा प्रचार करणारा ॲाटोचालक म्हणतो, “मुरली अण्णा यांनी अनेक विकास कामं केलीत, ते 3 लाख मतांनी निवडून येतील.” तर काँग्रेसचा प्रचार करणारा ॲाटोचालक म्हणतो, “भाजपवाले महागाईवर का बोलत नाही?”

Non Stop LIVE Update
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.