
पुण्यात 5 सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. तर काहींना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील आरोपी, बंडू आंदेकरचा लेक कृष्णा आंदेकरने स्वतः पोलिसांना शरण आला आहे. तसेच पोलिसांनी इतर 14 आरोपींनाही अटक केली आहे. जवळजवळ संपूर्ण आंदेकर कुटुंब हे तुरुंगात असल्याचे म्हटले जात आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकराला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या कृष्णा आंदेकरला समर्थ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. आयुष कोमकर प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 12 जणांना यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर स्वतः पोलिसांना शरण आला आहे. कृष्णा आंदेकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कृष्णा आंदेकरचा ताबा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. कृष्णा अंदेकरला पोलीस आज दुपारी कोर्टात हजर करणार आहेत.
Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…
इतर 13 आरोपी कोण?
आंदेकरांचे जवळपास पूर्ण कुटुंबच तुरुंगात आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, मित पाठोळे आणि सुजल मिरगू अशी आरोपींची नावे आहेत. या 13ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंदेकर गँगचे कोर्टात धक्कादायक आरोप
पुण्याच्या मकोका न्यायालयात बंडू आंदेकर आणि इतर आरोपींना काल, 15 सप्टेंबर रोजी हजर करण्यात आले. यावेळी बंडू आंदेकर आणि इतर आरोपींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.”गेल्या चार-पाच दिवसांपासून आम्हाला अंघोळ करू दिली नाही, ब्रश करण्यासही मज्जाव केला. शिवाय आम्हाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने कागदावर सही करायला लावली. त्या कागदात नेमकं काय लिहिलं आहे, हेही आम्हाला दाखवलं नाही,” असा आरोप आरोपींनी पोलिसांवर केला. त्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत आरोपींना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले.
लक्ष्मी आंदेकर यांच्यावर…
त्यानंतर सरकारी वकिलांनी या प्रकरणात, शस्त्र कुठून आले, हत्येसाठी आर्थिक मदत कोणी केली, ते कोणी पुरवले याचा तपास घेण्याची आवश्यकता आहे असे म्हटले. त्यावर आरोपींच्या वकिलाने, “सुजल आणि अमन यांचा तपास झाला आहे. रिकवरी, डिस्कवरी झाली आहे. त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची गरज नाही” असा युक्तीवाद केला. त्यानंतर आरोपींच्या दुसऱ्या वकीलाने म्हटले की, फक्त चुलत भाऊ असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अडकवले जात आहे. लक्ष्मी आंदेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांचे वय देखील जास्त आहे, त्या काही आजारांनी ग्रस्त आहेत, त्याचा कोर्टाने विचार करावा. त्याचबरोबर तांत्रिक तपासासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. भारती विद्यापीठच्या गुन्ह्यात यांचा काही संबंध नाही, मग या गुन्ह्यात कसा असेल? शिवम, वनराजच्या, केसमध्ये प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याच यात नाव घातलं आहे.”
वृंदावनी वाडेकर यांनी केला आरोप
वृंदावनी वाडेकर यांनी देखील या प्रकरणी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. आम्हाला आमच्या सुना आणि नातवंड सोबत असताना अटक करण्यात आली, पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं, सूर्योदयानंतर अटक केली असे त्या म्हणाल्या. मकोका न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.