राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली. मुंबई, कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर महापालिका थेट युतीच्या हातात गेल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका देखील भाजपाकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महापालिकांवर भाजपाची सत्ता आहे. सोलापूरमध्ये भाजपाने धमाकेदार कामगिरी केली. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली–मिरज–कुपवाड, सातारा, अहिल्यानगर, धुळे, जळगाव महापालिकांच्यी आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक दिग्गजांना धक्का बसला. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापाैर असणार आहे. कोल्हापूर महापालिकेतही महापाैर पद हे ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे. इचलकरंजीमध्येही ओबीसी महापाैर असेल. जळगाव महापालिकेचे महापाैरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे.
सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापाैर असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे.
राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 8, आणि सर्वसाधारण 17 प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. आता महापाैर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. आरक्षण सोडत दरम्यान राजकीय पक्ष आक्षेप घेताना दिसत आहेत. परभणी आणि मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतवर आक्षेप घेण्यात आला आहे.
आरक्षण सोडतदरम्यान ठाकरे गटाकडून गोंधळ घातला गेला. आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. आरक्षण स्पष्ट झाले असून पुणे महापालिकेचे महापाैर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. धुळ्यात देखील महिला खुल्या गटासाठी महापाैर पद राखीव असेल. नाशिक महापालिकेची महापाैर पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असून महिला ओबीसीसाठी महापाैर पद आरक्षित ठेवण्यात आले.
महापौरपदाचं आरक्षण
इचलकरंजी – ओबीसी
जळगाव – ओबीसी महिला
अहिल्यानगर – ओबीसी महिला
कोल्हापूर – ओबीसी
पुणे – खुला वर्ग (महिला)
धुळे – खुला वर्ग (महिला)
मालेगाव – – खुला वर्ग (महिला)
नाशिक – – खुला वर्ग (महिला)
सोलापूर – खुला
सांगली-मिरज-कुपवाड – खुला
पिंपरी चिंचवड – खुला