आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? पुण्यातील अंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल

| Updated on: Aug 20, 2021 | 11:56 PM

पोषण ट्रँकर या अॅपवर भरायची आहे. मात्र, ती सर्व माहिती इंग्लिश भाषेत भरावी लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. इंग्लिश येत नसल्याने आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविकांनी विचारला आहे.

आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? पुण्यातील अंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल
Follow us on

पुणे : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलाची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहेत. या सर्वांची माहिती पोषण ट्रँकर या अॅपवर भरायची आहे. मात्र, ती सर्व माहिती इंग्लिश भाषेत भरावी लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. इंग्लिश येत नसल्याने आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविकांनी विचारला आहे.

पुणे जिल्ह्यात जवळपास 4 हजार 623 अंगणवाड्या आहेत. त्यात जवळपास 3 हजार 932 अंगणवाडी सेविका आहेत. त्याच्या माध्यमातून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातली ही एक योजना आहे. मोबाईल आहे, पण रेंज नाही. त्यातच नेटवर्कचा खेळखंडोबा आणि इंग्रजी भाषेची अडचण यामुळे या अॅपवर माहिती भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना कसरत करावी लागत आहे.

हे अॅप शासनाने मराठी भाषेतून करावे. म्हणजे सर्वांना माहिती भरता येईल. अशा प्रकारची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

हेही वाचा : 

अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार, नेमकं कारण काय?

बुलडाण्यात अंगणवाडी सेविकांकडून शासनाला मोबाईल परत करण्याचं आंदोलन, ‘हे’ आहे कारण

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून अजून एक आत्महत्या?, यवतमाळ जिल्हा परिषदेवर ‘आयटक’चा धडक मोर्चा

व्हिडीओ पाहा : 

Anganwadi worker ask question government on English App Poshan Tracker for work