AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Loksabha fight : बारामतीत नणंद विरूद्ध भावजय सामना

बारामतीत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण पवार घराण्यातील २ सदस्य एकमेकांच्या समोर निवडणुका लढवत आहे. त्यामुळे आता बारामतीकरांचा कौल कुणाला मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा हा सामना होणार आहे.

Baramati Loksabha fight : बारामतीत नणंद विरूद्ध भावजय सामना
baramati loksabha election
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 30, 2024 | 8:44 PM
Share

Baramati loksabha election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळं नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत बारामतीत होणार आहे. बारामतीतच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित केली. त्यासोबत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत निश्चित झाली.

बारामतीत कांटे की टक्कर

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच, सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केलाय. तेव्हापासून सुनेत्रा पवारच बारामतीतून दादांच्या उमेदवार असतील हेही स्पष्ट झालं होतं. अखेर अधिकृत घोषणा झाली आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सध्या प्रचारातही बदल आवश्यक आहे, असं सांगतानाच सुनेत्रा पवार मतदारांना आपल्या विजयी करण्याचं आवाहन करत आहेत.

महिन्याभरापासून अजित पवारही बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. विकासासाठी माझ्याच उमेदवाराला विजयी करा असं आवाहन करत आहेत. विशेष म्हणजेच, बारामतीत विजय शिवतारेंचं बंडही शांत करण्यात अजित पवारांना यश आलं आहे. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीनंतर, शिवतारेंनी बारामतीतून माघार घेत असल्याची घोषणा केलीये.

बंडखोरी रोखण्यात यश

विजय शिवतारे यांच्या आधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंही समाधान झालं. त्यामुळं इंदापूरमधूनही सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नणंद भावजयच्या लढाईत कोण जिंकत याचा फैसला 4 जूनलाच कळेल.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अतिशय रंजक असणार आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या या मतदारसंघातून तीन वेळा खासदार आहेत. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा कौटुंबिक बालेकिल्ला मानला जातो.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. बारामतीत मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. NCP (शरद पवार गट) महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा (MVA) भाग आहे, ज्यात शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांचाही समावेश आहे.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान