बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3,596 पक्ष्यांचा मृत्यू, अनेक ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन : पशुसंवर्धन विभाग आयुक्त

| Updated on: Jan 15, 2021 | 3:10 PM

आतापर्यंत राज्यात बर्ड फ्लू या विषाणूमुळे तब्बल 3 हजार 596 पक्षांचा मृत्यू झाला आहे

बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3,596 पक्ष्यांचा मृत्यू, अनेक ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन : पशुसंवर्धन विभाग आयुक्त
Follow us on

पुणे : राज्यात आधीच कोरोनाने कहर केलेला असताना आता बर्ड फ्लूची भीती पसरतेय (Bird Flu Update). आतापर्यंत राज्यात बर्ड फ्लू या विषाणूमुळे तब्बल 3 हजार 596 पक्षांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबत संपूर्ण माहिती दिली (Bird Flu Update).

दहा किलोमीटर अंतरावर अलर्ट झोन

“बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3 हजार 596 पक्षांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोंबड्या, कावळे आणि बागळ्यांचा समावेश आहे. जिथं बर्ड फ्लूमुळे पक्षांचे मृत्यू झाले आहेत, त्याठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. शक्यता वाटल्यास कंट्रोल ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कायद्यानुसार सर्व अधिकार दिलेत”, अशी माहिती आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली.

तसेच, “आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर फेस्टिव्हलचं आयोजन करावं. आज पशूसंवर्धन आयुक्तालयात चिकन अंडी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्ड फ्ल्यूचं संक्रमण माणसांत नाही. आत्तापर्यंत त्याचं एकही उदाहरण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चिकन, अंडी बिनधास्त खाऊ शकता

“चिकन किंवा अंडी शिजवलेले किंवा बॉइल केले तर बर्ड फ्ल्यूचं व्हायरस पसरत नाही. चिकन, अंडी बिनधास्त खाऊ शकता. पोल्ट्री व्यवसायिकांचं सहकार्य चांगलं मिळतंय. ज्यांचं नुकसान होतंय त्यांना नुकसान भरपाई मिळणार, शासनाने नियमावली केली आहे”, असं म्हणत त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे (Bird Flu Update).

“पक्षी अभयारण्य ज्या ठिकाणी आहे, त्यासाठी फॉरेस्ट विभाग अलर्ट आहे. आर्थिक फटका किती बसला याचा अजूनही अंदाज नाही”, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्राचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरलाय

“70 डिग्रीवर चिकन, अंडी शिजवावे, त्यात कुठलाही व्हायरस टिकत नाही. एक किलोमीटरच्या आत एखादा बर्ड फ्ल्यूचा व्हायरसमुळे पक्षी मृत आढळला, तर त्या परिसरात असलेल्या पोल्ट्रीतील पक्षी मारले जाईलच, याबाबत केंद्राचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरलाय”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Bird Flu Update

संबंधित बातम्या :

बर्ड फ्लूमुळे व्यावसायिकांचे नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका; केंद्र सरकारचे आवाहन

राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

Bird Flu | ‘बर्ड फ्लू’ दरम्यान ‘चिकन’ खाणे किती धोकादायक? ‘या’ गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे!