Bird Flu | ‘बर्ड फ्लू’ दरम्यान ‘चिकन’ खाणे किती धोकादायक? ‘या’ गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे!

देशभरात ‘बर्ड फ्लू’चा कहर कायम आहे. बर्ड फ्लूसंदर्भात देशातील अनेक राज्यांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:09 PM, 14 Jan 2021

मुंबई : देशभरात ‘बर्ड फ्लू’चा कहर कायम आहे. बर्ड फ्लूसंदर्भात देशातील अनेक राज्यांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिल्लीच्या सर्व महानगरपालिकांच्या हद्दीत आता ‘चिकन’वर बंदी घालण्यात आली आहे. मांस विक्रीची दुकाने, रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमध्येही पोल्ट्री उत्पादने विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकांनी ‘चिकन’चा वापरही कमी केला आहे. मात्र, बरेच लोक चिकन स्वस्त झाले म्हणून पोटभर खात आहेत (Take care of this things while cooking chicken during bird flu).

जर, आपण देखील या काळात घरी चिकन बनवत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर आपण काही गोष्टी योग्य प्रकारे लक्षात घेऊन, चिकन खात असाल तर आपल्याला कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. सर्वत्र बर्ड फ्लू पसरलेला असताना, चिकन खाणे किती धोकादायक आहे आणि घरी चिकन बनवताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

बर्ड फ्लूच्या काळात, कोंबडीचे मांस खाल्ल्याने मानवांमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका असतो, असे म्हणतात. तथापि, बरेच तज्ज्ञ म्हणतात की, कोंबडीपासून मानवांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता कमी आहे. पण, तरीही कोंबडी खाण्यापूर्वी तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

चिकन विकत आणायचंय?

जर, आपण स्वत: कोंबडीचे मांस घेण्यास जात असाल, तर जेव्हा मांस खरेदी करताना साफसफाईची विशेष काळजी घ्या. मांस विकत घेताना, प्लास्टिकचे पॅकेट किंवा पिशवी वापरू नका. तसेच प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये मांस आणू नका. यासाठी, आपण आपल्याबरोबर एखादे स्टीलचे भांडे घेऊन जाऊ शकता. स्वतः जाण्याऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन देखील चिकन खरेदी करता येते, यात साफसफाईची आणि पॅकिंगची विशेष काळजी घेतली जाते (Take care of this things while cooking chicken during bird flu).

घरी चिकन आणल्यानंतर काय करावे?

कोंबडीचे मांस बाजारातून आणल्यानंतरही बर्‍याच गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. घरी चिकन आणल्यानंतर, पॅकेटमधून काढण्यापूर्वी आपले हात साबणाने धुवा. हात स्वच्छ धुल्यानंतरच चिकन बाहेर काढून हाताळा.

या प्रकारे चिकन साफ करा.

यानंतर, नेहमी प्रमाणे सामान्य पद्धतीने कोंबडी मांस धुवू नका. त्यास आधी साध्या पाण्याने धुण्याऐवजी, आरओच्या पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. आरओ नसल्यास, उकळलेल्या पाण्याने चिकन स्वच्छ करा. मांस साफ करत असताना ते स्वच्छ धुतले गेले असेल, याची खात्री करुन घ्या. त्यानंतरच ते मॅरीनेट करा.

शिजवतानाही काळजी घ्या.

कोंबडी मांस शिजवण्यासाठी मोठ्या आचेच्या गॅसचा वापर करा आणि चिकन चांगले शिजवू द्या. 70 अंशांपेक्षा जास्त तापमानात चिकन शिजवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने त्यातील कोणतेही विषाणूची जिवंत राहणार नाहीत.

(Take care of this things while cooking chicken during bird flu)

हेही वाचा :