Pune crime : पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागितली एक कोटी रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा, एकाला अटक

| Updated on: Jul 11, 2022 | 4:33 PM

सचिन गव्हाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सोनल गव्हाणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Pune crime : पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागितली एक कोटी रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा, एकाला अटक
पुणे आरटीओ (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एक कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. भोसरीतील 2019मधील हा प्रकार आहे. 2019मध्ये MIDC भोसरी पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) अजित शिंदे यांच्याकडे 1 कोटी रुपयांची लाच मागण्यात आला होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही आरटीओ अधिकार्‍यांवर फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिंदे यांनी शुक्रवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden police station) तक्रार दाखल केली होती. सचिन गव्हाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सोनल गव्हाणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

प्रस्ताव अद्याप प्रलंबित

पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून आपला ट्रक विशाल टाव्हरे याच्या नावावर हस्तांतरित केल्याप्रकरणी गव्हाणे यांनी 2019मध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ समीरविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तत्कालीन डेप्युटी आरटीओ, पिंपरी चिंचवड यांच्यासह सहा आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आरटीओ अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरीसाठी परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.

केली एक कोटी रुपयांची मागणी

सचिन गव्हाणे यांनी विविध सरकारी अधिकारी आणि विभागांना अनेक ई-मेल पाठवून आरोपी आरटीओ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या पोलिसांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र नंतर सचिनने आरटीओ शिंदे यांच्याकडे जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याने (सचिन) आणि त्याच्या पत्नीने माझ्याशी संपर्क साधला. आरोपी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मी एक कोटी रुपये गोळा करून त्यांना ती रक्कम द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. नंतर त्यांनी 85 लाख रुपयांची रक्कम ठरवली, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांची पोलीस कोठडी

1 जून 2022 रोजी, त्याने विविध सरकारी कार्यालयांना ई-मेल पाठवले ज्यात त्याने राज्यघटनेसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांनी माझ्याबद्दल बदनामीकारक भाषा वापरली. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर मी त्याच्या आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला, असे शिंदे म्हणाले. खंडणीच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.