AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरात कोरोना काळात तुम्ही सगळे कुठल्या बिळात लपलेला…फिल्डवर भाजप कार्यकर्ते असायचे : चंद्रकांत पाटील

सुप्रियाताई सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे,असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बाळासाहेब थोरात कोरोना काळात तुम्ही सगळे कुठल्या बिळात लपलेला...फिल्डवर भाजप कार्यकर्ते असायचे : चंद्रकांत पाटील
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:20 PM
Share

पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना माहिती आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्या काळात केंद्राच्या योजना सुरु होत्या तुम्ही लोकांना काय दिलं? असं सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढलं. रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची. लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता. आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचं अपयश आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नरेंद्र मोदींना काय म्हणायचंय ते लोकांना कळलंय

सुप्रियाताई सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे,असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र मोदींच एवढंच म्हणणं आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही. महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले. महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा,अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठेपणा शिका

मला आश्चर्य वाटलं तुमच्या बोलण्यात राऊत अजून कसे आले नाहीत, राऊत आलेच पाहिजेत त्याच्याशिवाय आपला इंटरव्ह्यू संपत नाही त्यामुळे नमस्कार, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळले. शरद पवार यांचा मोदींनी उल्लेख केल्याबद्दल विचारलं असता तो मोदींच्या मनाचा मोठेपण आहे. त्यांच्याकडून काही तरी शिका मोदी आपला विरोधक जरी असला दुष्मन जरी असला तरी त्याच्याबद्दल जे चांगल आहे त्याच कौतुक करतात. तुम्हाला चांगल्याच कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या

‘नमस्ते ट्रम्प’मुळेच कोरोना पसरला, मोदी हेच त्याला जबाबदार; नवाब मलिकांचा हल्लाबोल

केंद्रानं ट्रेन पाठवल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती, चंद्रकांत पाटील यांचं मविआच्या नेत्यांना प्रत्युत्तर

Chandrakant Patil slam Balasaheb Thorat said BJP party workers doing work during Corona

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.