उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले: चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 06, 2021 | 9:50 AM

भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला. | Chandrakant Patil CM Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे
Follow us on

पुणे: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोटी माहिती दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली. जनता ही फसवणूक खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray)

ते मंगळवारी भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. तसेच येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला.

तसेच राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज आहे. देशात स्लीपर सेलचे लोक सक्रिय असल्याचे कोरेगाव-भीमाच्या दंगलीवेळी दिसून आले. त्यामुळे आपल्याला वैचारिक संघर्ष करावा लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

एकाही सरकारी योजनेला मोदीचं नाव नाही: गिरीश बापट

आजपर्यंत भाजपचे शेकडो कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकट्या पश्चिम बंगालमध्ये संघ आणि भाजपच्या 157 कार्यकर्त्यांची हत्या झाली. पक्ष या कार्यकर्त्यांचे बलिदान कधी विसरणार नाही. कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा प्राण आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 योजना सुरु केल्या पण एकाही योजनेला स्वत:चे नाव दिले नाही. काँग्रेसच्या काळात इंदिरा आवास, संजय गांधी योजना सुरु करण्यात आल्या. त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या का? ते मोठे असतीलही पण देशापेक्षा मोठे नाहीत, असा टोलाही गिरीश बापट यांनी लगावला.

मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा (Lockdown) आदेश काढणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात (Thackeray govt) राज्यातील व्यापारी संघटनेने बंडाचे निशाण फडकावले आहे. मुंबई शॉप रिटेल असोसिएशनने राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. (Traders Association refuse to close down shops in Mumbai during Weekend Lockdown period)

दुकाने बंद राहिली तर माल सडेल. त्याची भरपाई कोण देणार? जागेचं भाडं आणि कामगारांचे पगार कोण देणार, असा सवाल फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उपस्थित केला आहे. राज्यात एकूण 13 लाख दुकाने आहेत. यापैकी 4 लाख दुकाने मुंबईत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची संख्या अवघी 35 हजार इतकी आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार व्यापाऱ्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या:

रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

मोठी बातमी: मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड

(Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray)