व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका टिपण्णी नको, नारायण राणे यांच्या नोटांवरील चित्राच्या वादावर प्रतिक्रिया

| Updated on: Oct 28, 2022 | 4:09 PM

आंदोलन करण्याचं काहीचं कारण नाही.

व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका टिपण्णी नको, नारायण राणे यांच्या नोटांवरील चित्राच्या वादावर प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील म्हणतात
Image Credit source: tv 9
Follow us on

पुणे : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला. अशाप्रकारचे वाद हे जिवंत माणसात होत असतात. मनवेदापर्यंत वाद जाणार नाही, यासाठी नेते सक्षम आहेत, असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, नोटांवर कुणाचे चित्र असावेत, यावर चर्चा होतेय. नारायण राणे यांचे चित्र नोटांवर छापले गेले. अशा व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका टिपण्णी करणे योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना उशिरा माहीत झाले. ठाकरे यांना असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहूनचं लोकांची दुःख कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला आहे. चांगलं आहे. प्रत्यक्ष फिल्डवर गेल्यावर काही मागण्या करायच्या असतात. त्या करत असताना आपण या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत. याची आठवण असायला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आंदोलन करण्याचं काहीचं कारण नाही. गरज अभ्यासली गेली तेव्हा आठ हजार प्राध्यापकांची गरज होती. रोस्टर चेक करावे लागते. जातीचं आरक्षण लागू झालं नाही. त्यामुळं रोस्टर चेक करा. आंदोलन करण्याचं काही कारण नाही. किती प्राध्यापक लागतील, याचा अंदाज घेऊन योग्य ती पाउलं उचलली जातील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायची असते. त्याशिवाय लोकांमध्ये हा भाव जात नाही की हे आपले प्रतिनिधीत्व करतात. फक्त ते सत्ताधारी होते. त्यावेळी करण्याच्या खूप गोष्टी होत्या. ते त्यांनी केल्या नाहीत. याची त्यांना जाणीव असावी. विरोधी पक्षाची दखल ही सत्ताधाऱ्यांनी घ्यायचीच असते. योग्य मागण्या मांडल्यास सरकार त्याची दखल घेईल.

काहीही घडलं की, पंचनामे सुरू करा. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जूनपासून आतापर्यंत जे जे नुकसान झालं. त्याची भरपाई बऱ्या प्रमाणात दिलेली आहे. आता तुम्ही तुमचे चार कार्यकर्ते आणि तीन पक्षांचे मिळून कार्यकर्ते. उद्धव ठाकरे यांचा प्रवास. त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते. उद्या काँग्रेसचे भारत जोडो आंदोलन. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते असं हे सुरू आहे. त्यामुळं गरजवंत आंदोलन करत नाहीत. त्याचा अर्थ त्यांना सर्व मिळालंय, असंही त्यांनी सांगितलं.