corona update|पुण्यात गर्दीच्या ठिकाणीही होणार आता कोरोना चाचणी ; विलगीकरण सेंटर बनवणार

| Updated on: Jan 09, 2022 | 7:02 AM

शहरात पाच ठिकाणी जवळपास २५० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच मोठ्यामोठ्या शासकीय कार्यालयात गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केली जाणार.

corona update|पुण्यात गर्दीच्या ठिकाणीही होणार आता कोरोना चाचणी ;  विलगीकरण सेंटर बनवणार
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. याबरोबरच खबदारारीचा उपाय म्हणून शहरातील गर्दीची ठिकाणे, कार्यालये, बाजारपेठा या ठिकाणी स्वतः जाऊन कोरोना चाचणी करुन घेण्याचा निर्णय आहे. महानगरपालिकेचा सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या महितीनूसार या रुग्णसंख्येची वाढत पाहता सार्वजनिक ठिकाणी होणार संसर्ग रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

कोविड सेंटर सुरु करणार
महानगरपालिका सणस मैदान, नायडू रुग्णालय , लायगुडे हॉस्पिटल यांसह शहरातीला १२ ठिकाणी स्वब सेंटर ( चाचणी केंद्र कार्यरत आहेत याबरोबरच येत्या दोन दिवसात महापालिकेच्या पाच विभागानुसार कोविड केअरसेंटर सुरु केली जाणार आहेत. ज्या नागरिकांना विलगीकरण राहण्याची सोय नाही, अश्या लोकांसाठी या सेंटरचा वापर केला जाणार आहे.

शहरात पाच ठिकाणी जवळपास २५० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे.  गर्दीच्या ठिकाणी तसेच मोठ्यामोठ्या शासकीय कार्यालयात गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केली जाणार. मागील दोन दिवसांपूर्वी बालेवाडी क्रीडा संकुलात २०० खेळाडूंची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये २८ खेळाडूंना लक्षणे आढळून त्यानंतर त्याना लगेच विलगीकरनात ठेवण्यात आले. अशी माहितीही त्यांनी दिली.

Bhiwandi: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा

अमरावतीमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

पुण्यात एसटीचे स्टेरिंग मॅकेनिकच्या हाती, कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांनी अडवली बस