Bhiwandi: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा

खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात 4 जानेवारीला गळा चिरलेल्या आणि चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पेटवण्याचे मोठे आव्हान होते.

Bhiwandi: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा
CRIME
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 11:44 PM

भिवंडी : प्रेम आंधळे असते आणि प्रेमाला वय नसते, याची प्रचिती भिवंडी शहरात घडलेल्या हत्या प्रकरणातून आली आहे. विवाहबाह्य संबंधात चार मुलांच्या आईने तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. प्रेमात पतीचा अडथळा नको म्हणून पतीला गावठी औषध घेण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तेथे त्याची हत्या केली. इतकेच नव्हे तर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पतीचा चेहरा विद्रुप केला. परंतु पोलिसांनी मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कच्या आधारे ओळख पटवत हत्या करणारी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली.

ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचा चेहरा केला विद्रुप

खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात 4 जानेवारीला गळा चिरलेल्या आणि चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पेटवण्याचे मोठे आव्हान होते. या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मृतदेहाच्या शर्टवरील ‘आयान फॉर मेन्स टेलर्स’ हा मार्क आढळला. त्याआधारे पोलिसांनी भिवंडीतील टेलर्स दुकानाचा शोध घेतला. त्यावरून तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफ (42, विठ्ठल नगर) याचा असल्याचे निष्पन्न झाले. तेथे जाऊन पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबियांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती घेतली असता त्याच इमारतीमधील असजद अन्सारी (32) ही व्यक्ती दफनविधीप्रसंगी हजर नसल्याची बाब समोर आली. अन्सारी पसार झाला होता. पोलिसांनी त्याला नारपोली परिसरातून अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

महिलेचे सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध

हत्या झालेल्या सलाउद्दीन मोहम्मद युसूफच्या 38 वर्षीय पत्नीचे 32 वर्षीय असजद अन्सारीशी मागील सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. दोघांच्या प्रेमात पतीचा अडसर ठरत असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. सलाउद्दीनला लघवीचा त्रास होता. त्यावर खारबाव येथील ग्रामीण भागात गावठी औषध मिळते, ते घेण्यासाठी पत्नीने त्याला गळ घातली. त्याच बहाण्याने महिलेने पतीला जंगलात नेले. तेथे आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली. नंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तोंडावर दगड आपटून चेहरा विद्रुप केला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाने कसून तपास केला आणि अवघ्या दोन दिवसांत आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली. न्यायालयाने दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (In Bhiwandi, the wife killed her husband with the help of her boyfriend)

इतर बातम्या

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड

Kalyan: कल्याणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.