AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड

बापाच्या या अतिरेकामागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला आहे. बापाने आपल्या मुलीला जंगलात नेऊन फाशी देण्याचा प्रयत्न केला. कारण या मुलीचे तिच्या सावत्र आईशी पटत नव्हते. या कारणावरून आरोपीच्या घरात वेळोवेळी भांडण होत होते.

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड
सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 9:59 PM
Share

नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात एका सहा वर्षांच्या चिमुकलीला अज्ञात इसमाने फासावर लटकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, या चिमुकलीला तिच्या बापानेच जीवे मारण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बापाच्या या कृत्यामुळे मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र हा प्रयत्न वेळीच निदर्शनास आल्यामुळे मुलीचे प्राण वाचले. या मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलीचे सावत्र आईशी पटत नसल्याच्या वादातून कृत्य

बापाच्या या अतिरेकामागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला आहे. बापाने आपल्या मुलीला जंगलात नेऊन फाशी देण्याचा प्रयत्न केला. कारण या मुलीचे तिच्या सावत्र आईशी पटत नव्हते. या कारणावरून आरोपीच्या घरात वेळोवेळी भांडण होत होते. घरगुती भांडणातून आरोपीला ही मुलगी नकोशी झाली होती. याच संतापातून आरोपी बापाने मुलीला जंगलात नेले आणि तिला एका झाडावर फासावर लटकावून ठार मारण्याचे अमानवीय कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फासल्यामुळे निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले. पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

जंगलात गाईंना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका जागरूक इसमामुळे निष्पाप मुलीचा जीव वाचला. मुलीला फासावर लटकवत असताना गायी चारणाऱ्या या इसमाने आरोपीला हटकले. त्यामुळे आरोपी लागलीच त्या जंगलातून पसार झाला. मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरु करीत पसार झालेल्या आरोपी बापाला पकडण्यात यश मिळवले. मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बापानेच आपल्या मुलीला जिवंतपणी फाशी देण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा

नराधम बापाच्या अमानवीय कृत्यावर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. घरगुती भांडणातून एका निष्पाप चिमुकलीला मारण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात बापाच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. नाशिक पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यामुळे अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा झाला आणि आरोपी बाप पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपीचे मुलीवरून त्याच्या पत्नीशी कायम भांडण व्हायचे. दोन दिवसापूर्वीच टोकाचे भांडण झाल्याने पत्नी घर सोडून गेली होती. त्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. (Attempt by father to hang six year old girl, The girl’s condition is currently critical)

इतर बातम्या

Kalyan: कल्याणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Delhi Crime : आधी चोरीच्या मोबाईलवरुन कॅब बुक केला, मग एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या; राजधानी दिल्ली पुन्हा हादरली

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.