AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Crime : आधी चोरीच्या मोबाईलवरुन कॅब बुक केला, मग एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या; राजधानी दिल्ली पुन्हा हादरली

आरोपींच्या चौकशीतून हत्याकांडामागील धक्कादायक कारणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच अटक असलेल्या दोन आरोपींव्यतिरिक्त त्यांना मदत करणाऱ्या अन्य आरोपींचाही सहभाग उजेडात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Delhi Crime : आधी चोरीच्या मोबाईलवरुन कॅब बुक केला, मग एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या; राजधानी दिल्ली पुन्हा हादरली
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीय. रोज नवनव्या गुन्हेगारी घटनांचा उलगडा होत आहे. त्यामुळे दिल्लीकर असुरक्षित वातावरणात वावरत आहेत. शुक्रवारी एकाच रात्री 2 कॅब चालकांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य जिल्ह्यातील असून एकाच वेळी दोन हत्याकांड घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपींच्या चौकशीतून हत्याकांडामागील धक्कादायक कारणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच अटक असलेल्या दोन आरोपींव्यतिरिक्त त्यांना मदत करणाऱ्या अन्य आरोपींचाही सहभाग उजेडात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

चोरीच्या फोनवरून बुक केली कॅब; लुटीच्या हेतूने केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या फोनवरून कॅब बुक केली होती. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने दोन्ही कॅबच्या चालकांची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत. याबाबत मध्य जिल्हा पोलिसांनी सांगितले की, छविनाथ हे ओला-उबेर कॅब चालवत असत. गुरुवारी रात्री 12.30 वाजल्यानंतर अनोळखी व्यक्तीने आनंद पर्वत परिसरातून त्यांची कॅब बुक केली होती. दुपारी 1 वाजल्यापासून कुटुंबीयांना छविनाथचा कोणताही सुगावा लागला नव्हता. खूपदा प्रयत्न करूनही त्यांच्या क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे छविनाथच्या घरातील मंडळी आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड काळजीत सापडले होते. छविनाथ यांच्याशी संपर्क न झाल्याने काहीतरी अनुचित घडल्याची शक्यता बळावली होती.

गुलाबीबाग परिसरात सापडली बेवारस कॅब

याचदरम्यान गुलाबीबाग पोलिसांनी हरियाणा क्रमांकाची कॅब बेवारस स्थितीत जप्त केली. शुक्रवारी सकाळी ही कॅब सापडली. पोलिसांनी नंबर प्लेटच्या आधारे तपास सुरू केला असता, संबंधित कॅब छविनाथची असल्याचे उघडकीस आली. त्यानंतर छविनाथच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर भारत नगर परिसरातील एका नाल्यात छविनाथचा मृतदेह सापडला आणि छविनाथच्या हत्येचा उलगडा झाला.

आनंद पर्वत परिसरात सापडला दुसऱ्या कॅब चालकाचा मृतदेह

त्याच दिवशी आनंद पर्वत परिसरात अनिल यादव नावाच्या ड्रायव्हरचाही मृतदेह कॅबमध्ये सापडला. या दोन्ही केसेस सारख्याच होत्या. त्यामुळे मध्य जिल्हा पोलिसांनी आकाश आणि जुनैद या दोन चोरट्यांना पाळत ठेवून अटक केली. या दोघांसह आणखी एक सूत्रधार प्रीतमचा शोध घेतला जात आहे. चौकशीत या लोकांनी चोरीच्या मोबाईलवरून कॅब बुक केल्याचे आणि त्यांचा लुटण्याचा हेतू होता, असे निष्पन्न झाले आहे. लुटीचा हेतू साध्य झाल्यानंतर आरोपींची दोन्ही कॅब चालकांची हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. (Two cab drivers killed in one night in Delhi, Two accuse arrested)

इतर बातम्या

MP Crime: आधी मुलीसमोर आईला मारले, मग कीटकनाशक पिऊन स्वतः केली आत्महत्या, जाणून घ्या मध्य प्रदेशात नेमके काय घडले?

sulli deal : “सुल्ली डिल” प्रकरणातील आरोपीची पोलिसांनाच धमकी, प्रकरण काय? वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.