AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा, तुमची उणीव भासतेय… धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर,अजित पवारांच्या जयंतीनिमित्त नेत्यांकडून आदरांजली

Ajit Pawar Birth Anniversary: अजित पवार यांची आज जयंती आहे. अनेक नेत्यांनी त्यांना आज आदरांजली वाहिली. यावेळी धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सोशल मीडिायवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

दादा, तुमची उणीव भासतेय... धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर,अजित पवारांच्या जयंतीनिमित्त नेत्यांकडून आदरांजली
धनंजय मुंडे, अजित पवार
| Updated on: Jul 22, 2026 | 11:17 AM
Share

Dhananjay Munde on Ajit Pawar: आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते, शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती धावपट्टीजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे पक्षासह अनेक नेत्यांना मोठा हादरा बसला. महाराष्ट्र हळहळला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त नेत्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी त्यांच्या भावनेला अश्रूतून वाट मोकळी करून दिली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा आज आदरांजली वाहताना हुंदका आवरला नाही. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही केली. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर

धनंजय मुंडे यांनी अजितदादांना आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना हुंदका आवरता आला नाही. रुमालाने डोळे पुसत त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. आज अनेक नेत्यांनी अजितदादांना आदरांजली वाहिली. दादांच्या अकाली एक्झिटमुळे अनेक नेत्यांना मोठी पोकळी जाणवत आहेत. त्यांच्या आठवणी जागवताना अनेकांना अश्रू अनावर झाले.

सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांची पोस्ट

दादा, आपल्या जन्मदिनाला जयंती म्हणावी लागेल, ही कल्पना स्वप्नात सुद्धा येत नाही, तसा विचार अजूनही मनाला शिवत नाही. नियतीने ही वाईट आणि अजब वेळ का आणली असेल, याचं उत्तर शोधतोय. तुम्ही सोबतीला नाहीत, पण तुमची जाणीव आहे सोबतीला, ती जाणीव प्रेरणा देत राहील जनसेवेची आणि कर्तव्यनिष्ठेची… प्रथम जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक आदरांजली दादा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

शासकीय व राजकीय आदरांजली

राज्य सरकारने 22 जुलै हा दिवस अधिकृतपणे अजितदादांचा जयंती दिन म्हणून घोषित केला आहे. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत या जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात, शाळा, महाविद्यालयांमध्ये दादांना आदरांजली वाहण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कुटुंबियांनी, राज्यातील प्रमुख नेत्यांनी बारामती येथील स्मृतीस्थळावर आणि विमान अपघाताच्या ठिकाणी जाऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...