तरुणीसोबत मैत्री पडली चांगलीच महागात, पुणे येथील ज्येष्ठ नागरिकाला बसला एक कोटीचा फटका

| Updated on: Feb 05, 2023 | 12:55 PM

आरोपींकडून वारंवार होणारी पैशांची मागणी थांबत नव्हती. यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर रजत सिन्हा व नेहा शर्मा यांच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तरुणीसोबत मैत्री पडली चांगलीच महागात, पुणे येथील ज्येष्ठ नागरिकाला बसला एक कोटीचा फटका
डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली फसवणूक
Follow us on

पुणे : तरुणीसोबत मैत्रीचे आमिष पुणे शहरातील एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली आहे. सायबर चोरट्याने बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपये घेतले. के. बी. टेलीकॉम या डेटिंग सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली 2 सायबर चोरट्यांनी  1 कोटी रुपयांत फसवणूक केली. रजत सिन्हा, नेहा शर्मा अशी या सायबर चोरट्यांची नावे सांगितली जात आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहरातील उच्चभ्रु घरातील एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचे निधन झाले आहे. यामुळे ते एकटेच राहत होते. नेहा शर्मा या तरुणीने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावरुन त्यांना संपर्क साधला. त्यांना डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींसोबत मैत्रीची संधी असल्याचे सांगत आमिष दाखवले. तसेच, पुन्हा विवाह करता येईल, असे सांगितले. यासंदर्भात रजत सिन्हा, नेहा शर्मा यांच्यांकडून त्यांना वारंवार फोन येत होते. मे 2022 पासून हा प्रकार सुरू होता.

अशी केली फसवणूक

हे सुद्धा वाचा

डेटिंग सेवा घेण्याकरिता सुरुवातीला पैसे कंपनीत पैसे भरावे लागतील. ते पैसे भरल्यावर वेगवेगळी कारणे देत रिफंडबेल चार्जेस असल्याचे सांगत अजून रक्कम घेतली. ही रक्कम त्यांना वेगवेगळ्या खात्यात भरण्यास सांगण्यात आली. त्यानुसार तक्रारदार विविध खात्यात पैसे भरत गेले. पुढे जाऊन तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हीस घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुमची समाजात बदनामी करु, तुमच्यावर गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन वर्षभर पुन्हा पैसे उकळले. त्यानुसार तक्रारदाराने आतापर्यंत एक कोटी दोन लाख रुपये त्यांना दिले.

अखेर पोलिसांकडे धाव

आरोपींकडून वारंवार होणारी पैशांची मागणी थांबत नव्हती. यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर रजत सिन्हा व नेहा शर्मा यांच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांचे आवाहन

सायबर चोरटे विविध प्रकारचे आमिष देऊन फसवणूक करतात. यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे डेटिंग सर्व्हिसला बळी पडू नये आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन पुणे  सायबर पोलिसांनी केले आहे.