पंतप्रधानांच्या हस्ते जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण, कसं आहे नवं शिळा मंदिर?

| Updated on: Jun 14, 2022 | 3:57 PM

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या शीळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आज सकाळपासूनच देहूतील शिळा मंदिर परिसरात उत्साह संचारलेला आहे. त्या शिळामंदिराचे काही फोटो

पंतप्रधानांच्या हस्ते जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण, कसं आहे नवं शिळा मंदिर?
modi dehu lokarpan
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

देहू – जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj)यांच्या शीळा मंदिराचे (Shila mandir)लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आज सकाळपासूनच देहूतील शिळा मंदिर परिसरात उत्साह संचारलेला आहे. या शिळेवर बसूनच संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न त्याग केला होता. या मंदिराची पाहणी पंतप्रधान मोदींनी केली. तसेच या मंदिराच्या परिसरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. तसेच रामाच्या मंदिरात जाऊन त्यांनी रामाचे मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. ६१ फुटी ध्वजावलाही त्यांनी वंदन केले.

शिळा मंदिर परिसरात उत्साह

शीळा महाराजातील संत तुकारामांची मूर्ती ४२ इंचाची आहे. तुकाराम महाराजांचे आयुष्यमान हे ४२ वर्षांचे होते त्यामुळे उंचीची मूर्ती ही ४२ इंच ठेवण्यात आली आहे. तर मंदिराच्या कळसापर्यंतची उंची ४२ फूट ठेवण्यात आलेली आहे.

शीळा मंदिर- संत तुकाराम महाराजांची ४२ इंचाची मूर्ती

मंदिराची रचना हेमाडपंती असून सुरेख गर्भगृह आहे. त्याचा आकार १४ फूट बाय १४ फूट असा आहे. आतले गर्भगृह ९ फूट बाय ९ फूट असे आहे. या मंदिराची उंची १७ बाय १२ फूट अशी आहे.

हे सुद्धा वाचा

शीळा मंदिर – हेमाडपंती गर्भगृह

आधीच्या मंदिरात कळस आणि तुकाराम महाराजांची मूर्ती न्वहती. आता संपूर्ण काळ्या पाषाणात मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरावर ३६ कळसही लावण्यात आले आहेत.  मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी १७ लाख ४७ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला.

शिळा मंदिरावर ३६ कळस

तुकोबारायांनी ज्या शिळेवर १३ दिवस अन्नत्याग करुन उपोषण केले होते, त्यावर भव्य मंदिर बांधण्याचा वारकरी संप्रदायाचा आग्रह यानिमित्ताने पूर्ण झाला आहे. आता देहूतील मुख्य मंदिरात ही शिळा स्थापन करण्यात आली असून या मंदिराला शिळा मंदिर असे म्हटले जाते.

शिळा मंदिर- संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस केला होता अन्नत्याग

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली होती. त्यानंतर तुकाराम महाराजांनी अन्नपाणी त्यागलं होतं. त्या काळात याच शिळेवर बसून त्यांनी उपोषण केले होते. तीच शीळा तपोवन महाराजांनी देहूच्या मंदिरात आणून ठेवली होती.

शिळा तपोवन महाराजांनी आणली मंदिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार म्हणून या मंदिराच्या आजूबाजूला आकर्षक सजावट करण्यात आली होती.

शिळा मंदिरात आकर्षक सजावट