AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीत प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, कधी कधी…; देवेंद्र फडणवीस यांनी दोन पावलं मागं घेत विरोधकांना इशारा दिला…

उद्या कर्नाटकमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पुन्हा येईल तेव्हा 28 पैकी 25 जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, कधी कधी...; देवेंद्र फडणवीस यांनी दोन पावलं मागं घेत विरोधकांना इशारा दिला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 15, 2023 | 10:07 PM
Share

पुणेः कर्नाटक विधानसभेत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर ज्या प्रमाणे काँग्रेसकडून विश्लेषण केले जात आहे. त्याचप्रमाणे भाजपकडूनही त्या पराभवाचं स्पष्टीकरण दिले जात आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक नेते स्टार प्रचारक म्हणून सहभागी झाले होते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कर्नाटकमधून काँग्रेसवर आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केला होता. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात झालेला भाजपच्या पराभवाचं त्यांनी आकडेवारीसह विश्लेषण केले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, कर्नाटकात भाजपचा हा पराभव झाला असला तरी तो पराभव अगदी पॉईंट झिरो फोर परसेंट एवढे फक्त आपले मत कमी झाले असं त्यांनी स्पष्टच सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो असलो तरी मतांमध्ये फार मोठ्या फरकाने काही फरक पडला नाही.

कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी लोकांच्या मतांचा आम्ही आदर करत तो पराभव आम्ही मान्य केला आहे. तसेच प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, कधी जिंकावं लागतं तर कधी कधी हरावंही लागतं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या विधानसभेच्या निवडणुकीत हार झाली परंतु कर्नाटकच्या निकालाचा जर विश्लेषण केलं तर 2018 साली भारतीय जनता पक्षाला 36 टक्के मतं मिळाली होती आणि 106 जागा मिळाल्या होत्या तर आता 36 टक्केच्या ऐवजी आपल्याला 35.6 टक्के म्हणजे पॉईंट झिरो फोर परसेंट एवढे फक्त आपले मत कमी झाले आहे.

पण जागा आपल्या 40 कमी झाल्या त्याचं कारण असं होतं की 2018 साली जेडीएस, जनता दल सेक्युलर या पक्षाला 18 टक्के मतं होती. यावेळेस त्यांची पाच टक्के होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ही मतं काँग्रेससोबत होती त्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी विजय मिळाला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटकच्या निवडणुकीत कुठे आपली मतं कमी झाली नाहीत पण मी आज दाव्याने सांगतो आहे की, प्रत्येकाने हे लिहून घ्यावं की उद्या कर्नाटकमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पुन्हा येईल तेव्हा 28 पैकी 25 जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?